Home नांदेड अंबुलगा बु. येथील साल गड्याच्या मुलीची पोलीस शिपाई पदी निवड.

अंबुलगा बु. येथील साल गड्याच्या मुलीची पोलीस शिपाई पदी निवड.

96
0

आशाताई बच्छाव

IMG-20230524-WA0040.jpg

अंबुलगा बु. येथील साल गड्याच्या मुलीची पोलीस शिपाई पदी निवड.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

अंबुलगा येथील रहिवासी असलेल्या दुसऱ्याच्या शेतात सालगडी राहून आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करत हाल अपेष्टा सहन करणाऱ्या मुखेड तालुक्यातील अंबुलगा बु येथील मालू मंत्रे या सालगड्याच्या मुलीने विविध संकटावर मात करत सोलापूर शहर पोलीस दलात चालक या पदाच्या परीक्षेत यशस्वी मजल मारत वयाच्या २१ व्या वर्षीच पोलीस सेवेत आपले स्थान पटकावून अंबुलगेकरांची मान उंचावली आहे.आई वडलांनी घडवलेल्या संस्कारातून आर्थिक परिस्थिती वर मात करत संगिताने शारीरिक व बौद्धिक क्षमता पात्र करून पहिल्याच प्रयत्नात शिपाई चालक पदाच्या सेवेत घवघवीत यश मिळवले.
तिचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले.शांती निकेतन विद्यालयातून १० वी ची परीक्षा उत्तीर्ण होऊन ती पुढील शिक्षणासाठी नांदेडला आली आणि यशवंत महाविद्यालयातून तीने ११ वी आणि १२ वीचे शिक्षण घेवून त्याच महाविद्यालयातून तीचे पदवी शिक्षण सुरू केले.बी.ए च्या र्ततीय वर्षात शिक्षण घेत असताना पोलीस शिपाई म्हणून निवड झाली.
अशिक्षित आई वडिलांनी काबाडकष्ट व मजुरी करून आपल्या मुलांना मात्र उच्चशिक्षण दिले.या यशाबद्दल परीसरात सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

 

पोलीस बनण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून,त्यासाठी कसोटीचे प्रयत्न करत होते.आई वडीलांनी आयुष्यभर कष्ट करून मला शिकवले त्यांच्या पाठबळामुळे व मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनामुळे मी हे यश संपादन करु शकले.परीस्थिती कितीही बिकट असु द्या ध्येय गाठण्याची जिद्द असेल तर यशाला झुकावेच लागते.
(संगिता मालू मंत्रे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here