Home Breaking News ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही; मुख्यमंत्री ठाकरे यांची ग्वाही –

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही; मुख्यमंत्री ठाकरे यांची ग्वाही –

70
0

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही; मुख्यमंत्री ठाकरे यांची ग्वाही –
विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

मुंबई, दि.२२ – मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही. याबाबत ओबीसी समाजाच्या शंका, कुशंका आणि भीती दूर करण्यासाठी अ‍ॅडव्होकेट जनरल (महाधिवक्ता) यांच्यासमवेत तुमची भेट घडवून आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

ओबीसी व भटके विमुक्तांच्या न्याय मागण्यांसंदर्भात ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. यात सार्वजनिक बांधकाम मंत्री
अशोक चव्हाण, अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ओबीसी-व्हीजेएनटी संघर्ष समितीचे प्रकाश शेंडगे, हरिभाऊ राठोड यांच्यासह ओबीसी चळवळीतले अनेक नेते सहभागी झाले होते. ठाकरे म्हणाले, ओबीसींच्या प्रश्नांची दखल मी यापूर्वीही घेतली आहे.

अर्थसंकल्पातून चांगली स्वप्ने राज्यासाठी घेऊन आलो असतांना कोरोनाचे संकट आले आहे. पण असे असले तरी ओबीसी समाजाचा एकही प्रश्न किंवा मुद्दा सोडून देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

Previous articleकोरोना संशयीत मृत स्त्रीच्या पार्थिवावर मुस्लिम बांधवानी केले अंत्यसंस्कार.*
Next articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साधला संवाद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here