• Home
  • कोरोना संशयीत मृत स्त्रीच्या पार्थिवावर मुस्लिम बांधवानी केले अंत्यसंस्कार.*

कोरोना संशयीत मृत स्त्रीच्या पार्थिवावर मुस्लिम बांधवानी केले अंत्यसंस्कार.*

*कोरोना संशयीत मृत स्त्रीच्या पार्थिवावर मुस्लिम बांधवानी केले अंत्यसंस्कार.*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)*

कोल्हापूर येथील बैतूलमाल कमिटी चे सदस्य काल दुपारी मुस्लिम समाजातील 3 व्यक्ती मृत झालेने सीपीआर येथे अंत्यविधी मदतीसाठी गेले होते. तेथे दुपारी icu बाहेर एक जोडपे जोरात आक्रोश करून रडत होते. याबाबत नगरसेवक तौफिक मुल्लाणी, राजू नदाफ यांनी सदर दांपत्याची चौकशी करून त्यांना इचलकरंजी येथील स्थानिक नगरसेवक जाधव यांचेशी संपर्क करून दिला. त्यांनी मृत पतीला कोल्हापूर पाठवतो पण अंत्यसंस्कार तेथेच करा असे सांगितल्याने बैतूलमाल कमिटीचे मौलाना जाफर बाबा यांचे मार्गदर्शनाखाली रात्री या स्त्री वर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. या परिवाराला कोल्हापूरातील काहीही माहीती नसलेने अंत्यसंस्कारच्या सर्व प्रक्रीया पार पाडण्यात बैतूलमाल कमिटीचे मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला व अचानक घडलेल्या दूखाःने हतबल कुंटंबाला आधार देखील दिला. या कुटूंबाने अतिशय भावनिक होऊन सर्व मुस्लिम बांधवांचे आभार मानले. सदर मृतचा कोरोना अहवाल अद्याप प्रलंबित आहे. बेळगाव येथील बहिणीला फोनवरून येथील बांधवांनी खूप मनापासून अंत्यसंस्कार केले व त्यांची पूर्ण व्यवस्था केली असे सांगताना भावाला जोरात रडू कोसळले. यावेळी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, राजू नदाफ, जाफर मलबारी,नवेझ मुल्ला, वासीम चाबूकस्वार, सैफूल्ला मलबारी, लालू मिरशिकारी, सादीक रंगरेज, जाफर महात आणि कोल्हापूर महानगरपालिका , सीपीआर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. बैतूलमाल कमिटी वतीने पंचगंगा स्मशानभूमीत दूसरा अंत्यसंस्कार करण्यात आला.

anews Banner

Leave A Comment