• Home
  • शिवसेना वंचित युतीचा वरवट बकाल बस स्थानकावर जल्लोष

शिवसेना वंचित युतीचा वरवट बकाल बस स्थानकावर जल्लोष

आशाताई बच्छाव

IMG-20230128-WA0052.jpg

शिवसेना वंचित युतीचा वरवट बकाल बस स्थानकावर जल्लोष

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क संग्रामपूर)

नुकतीच शिवसेना व वंचित बहुजन आघाडीची युती झाली असून याबद्दल 28 जानेवारी रोजी वरवट बकाल येथील बस स्थानक चौकात शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला .शिवसेनेचे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांचे मार्गदर्शनात आदेशानुसार वरवट बकाल येथे वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतरावजी भोजने यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती
वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेच्यावतीने वरवट बकाल शहरातील बस स्थानक परिसरात फटाक्याच्या आतिषबाजीत मीठाई वाटप करून खूप मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतरावजी भोजने यांनी मार्गदर्शन करताना शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या युती मागची भूमिका विशद केली
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते आत्माराम वसुलकार काका, देविदास दामोदर, रवींद्र भेलके ता. अध्यक्ष , आशिष धुंधळे ,शिवसेनेचे रवींद्र झाडोकार ता.प्रमुख, अमोल ठाकरे किसान सेना ता.प्रमुख, शुभम घाटे शहर प्रमुख ,प्रल्हाद अस्वार वाहतूक सेना, विजय मारोडे उप.ता.प्रमुख, कैलास कडाळे उप ता. प्रमुख, जनाभाऊ कुरवाडे, रामदास मिसाळ, भगवान कान्हे,विलास खाडे, भगवान पवार, मुरली इंगळे ,रामदास मोहे,अमोल मोदे युवा सेना उप जिल्हाप्रमुख , शिवाजी अढाव माजी युवा सेना ता.प्रमुख, राहुल मेटांगे, मंगेश राजनकर, धनंजय आवचार, विशाल बकाल ,नितीन भिसे, गोपाल पाटील, निलेश झाडोकार,भैय्या पाटील, वडगाववान सरपंच पंकज रामदास मिसाळ, राजेंद्र धर्माधीकारी, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय धुंदाळे हे उपस्थित होते तर वंचित बहुजन आघाडीचे सचिन राऊत युवा जिल्हा महासचिव, उत्तम उमाळे ,शत्रुघ्न बाजोडे ,युवराज वानखडे ,राहुल भिलंगे ,विजय पहुरकर, संजय इंगळे ,बबलू चोपडे, उमेश भिलंगे, यांचे सह शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी व असंख्य भीमसैनिक आणि शिवसैनिक उपस्थित होते
यावेळी किसान सेना तालुकाप्रमुख अमोल ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा गळ्यामध्ये रुमाल देऊन सत्कार केला.

anews Banner

Leave A Comment