Home नांदेड सावरगाव पी. येथे प्रजासत्ताक दिन, पालक मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

सावरगाव पी. येथे प्रजासत्ताक दिन, पालक मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

89
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230128-215044_WhatsApp.jpg

सावरगाव पी. येथे प्रजासत्ताक दिन, पालक मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
मुखेड तालुक्यातील मौजे सावरगाव पी. येथील बॕरिस्टर ए.आर. अंतुले उर्दू व मराठी प्राथमिक शाळेत दि.२६ जानेवारी रोजी ७४ वा प्रजासत्ताक दिन व पालकमेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहन संस्थेचे संस्थापक सचिव अल्लाऊद्दीन शेख यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील मुख्य मार्गाने विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर शाळेत पालक मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. याकार्यक्रमाचे अध्यक्ष मुखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे, उद्घाटक शाळेचे संस्थापक सचिव शेख अल्लाऊद्दीन मुनवरसाब सह प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख राजकुमार पंदरगे, एस.एस. करेवाड, सरपंच प्रतिनिधी मुजाहेद अली ईनामदार व उपसरपंच एजाज मुजावार, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश पाटील कबीर, माजी सरपंच विठ्ठल देवकत्ते होते. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी भारताचे सविंधानाचे वाचन व भाषण केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांची कलागुण पाहून कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे, केंद्रप्रमुख करेवाड एस.एस. यांनी प्रशंसा केली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव येवते, सहशिक्षक विश्वांबर लंगोटे, गौस रऊफ शेख, हसनोद्दीन शेख उर्फ बबलु मुल्ला, शाहजोर फारुक गफार ,यादव कांबळे सहशिक्षिका यासमिन समद करुणा पोतदार , आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शौकत अली यांनी परिश्रम घेतले. याकार्यक्रमात विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleतृणधान्याच्या महत्त्वासाठी जिल्हा परिषदेत भाकरी-ठेचातून बचतगटांच्या महिलांनी दिला संदेश
Next articleशिवसेना वंचित युतीचा वरवट बकाल बस स्थानकावर जल्लोष
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here