Home गडचिरोली मौशिखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात गुंजला जय-भिम नामाचा गजर…!

मौशिखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात गुंजला जय-भिम नामाचा गजर…!

125
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220415-WA0168.jpg

मौशिखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात गुंजला जय-भिम नामाचा गजर…!

शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य अरविंद कात्रटवार यांनी परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन

परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श जोपासून वाटचाल करावी—

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील गिलगाव, अमिर्झा, टेंभा, कळमटोला, आंबेशिवणी, गिलगाव, आंबेटोला येथे उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य श्री,अरविंदभाऊ कात्रटवार यांनी जिल्हा परिषद क्षेत्रात सर्वच गावातील कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवून बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य गावा गावात उत्साहाचे वातावरण पसरले होते. जय भिम नामाच्या जयघोषाने गाव परिसर दुमदुमून गेला.
मागील दोन वर्ष कोरोनाचे सावट असल्याने शासनाने सर्वच सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध लावले होते.यावर्षी कोरोनाचे निर्बंध काढण्यात आल्याने
मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील समाज बांधवांनी सर्वत्र जल्लोषात बाबासाहेबांची जयंती साजरी करून त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन अभिवादन केले.गावात निळे ध्वज, निळया पताका व जय-भिम चा जयघोषाने मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या गावातील वातावरण भिममय झाले होते
कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करतांना शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अरविंद भाऊ कात्रवाटर म्हणाले की,भारतरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा व त्यांचे कार्य हे केेवळ आपल्या भारत देशापुरतेच नव्हे समस्त जगासाठी प्रेरणादायी आहे. बाबासाहेबांनी समाजातील दिन दुबळयाच्या सेवेसाठी आपले जीवन अर्पण केले. त्यांच्या कार्यामुळे आज बहुजन समाजाला न्याय, हक्क मिळून सन्मानाचा दर्जा प्राप्त झाला आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी व आपले ध्येय गाठण्यासाठी सर्वप्रथम काटेरी मार्गाचा सामना करावा लागतो. तेव्हाच आपण यशस्वी होऊ शकतो शिक्षण हे यशस्वी जीवनाचा महत्वपुर्ण भाग आहे. त्यामुळे प्रत्येकांनी शिक्षण घेऊन विद्याभूषीत बनले पाहिजे. जीवनात सहजासहजी काहीच प्राप्त होऊ शकत नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागतोच. त्यामुळे परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श जोपासून समाजबांधवांनी वाटचाल करावी आणि समाजाचा विकास घडवून आणावा. देशात समता व बंधुत्वता निर्माण होण्यासाठी परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला महत्वपुर्ण अशी राज्यघटना अर्पण केली. राज्यघटनेत सर्वांना न्याय, हक्क अधिकार बहाल करण्यात आले आहे.भारतीय राज्यघटनेतील तरतूदीची प्रभावी अंमलबजावणी होऊन सर्वांना न्याय , हक्क, अधिकर प्राप्त झाला पाहीजे, असेही शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले.या प्रसंगी उपस्थित शिवसेना सह संपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य अरविंद भाऊ कात्रटवार,उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे,रामटेके साहेब,सुनील मेश्राम,प्रमोद गावड़े,राहुल सोरते,स्वप्निल खांडरे,राजू जवादे,अरुण बरपात्रे,संजय मेश्राम, नेकेश लोहबरे,दसरथ चापले यांच्या सह गावातील समाज बांधव व गांवकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleयवत पोलीस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न
Next articleउंद्री प..दे. येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here