Home पुणे यवत पोलीस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न

यवत पोलीस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न

29
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220415-WA0176.jpg

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी प्रशांत नागणे,                                दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार तसेच गुन्हे शोध पथकाचे निलेश कदम गुरुनाथ गायकवाड यांच्या उत्कृष्ट कामगिरी ची पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी घेतली दखल पुणे जिल्ह्यातील “सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत” पुरस्काराने गौरवले ….मा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख पुणे ग्रामीण यांनी 15/ 04 /22 रोजी पुणे ग्रामीण जिल्ह्याची बैठक भीमाशंकर सांस्कृतिक हॉल पुणे चव्हाण नगर येथे मासिक गुन्हे आढावा बैठक आयोजित केली होती पुणे ग्रामीण जिल्ह्यातील चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यवत पोलीस स्टेशन यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार व गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार निलेश कदम गुरुनाथ गायकवाड यांना पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.यवत पोलीस स्टेशन हद्दीत सोसायटी निवडणुका च्या अनुषंगाने अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इस मान वर कारवाई करण्याबाबत यवत पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक राहू परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार निलेश कदम व गुरुनाथ गायकवाड यांना प्रेस माध्यमातून बातमी मिळाली होती की मौजे राहू गावातील महात्मा फुले चौकात नावे दिनेश महादेव मोरे रा राहू ता दौंड जि पुणे बारकू राजेंद्र शिंदे व त्यांचे इतर तीन साथीदार हे बेकायदेशीर गावठी पिस्टल आपल्या जवळ बाळगून उभे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने यवत पोलीस स्टेशन ग्रुपने सदर ठिकाणी जाऊन वरील इसमांना ताब्यात घेतले या संपूर्ण तपासात सहा आरोपींकडून 7 गावठी पिस्टल व 24 राऊंड जप्त करण्यात आले होते.या उत्कृष्ट कामगिरीबद्दल माननीय पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पोलीस निरीक्षक नारायण पवार पोलीस कर्मचारी निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड यांना सन्मानित केले आहे

Previous articleकात्रज दूध संस्था पुणे संचालक पदी निवड झालेले श्री स्वप्नील ढमढेरे यांचा शिक्रापूर पाबळरोड व्यापारी यांच्याकडून सत्कार
Next articleमौशिखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात गुंजला जय-भिम नामाचा गजर…!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here