Home उतर महाराष्ट्र लसीकरण सुरू असतानाच डॉक्टरची आत्महत्या; सुसाईड नोट आली समोर, वाचा काय होतं...

लसीकरण सुरू असतानाच डॉक्टरची आत्महत्या; सुसाईड नोट आली समोर, वाचा काय होतं कारण. 🛑

252

राजेंद्र पाटील राऊत

🛑 लसीकरण सुरू असतानाच डॉक्टरची आत्महत्या; सुसाईड नोट आली समोर, वाचा काय होतं कारण. 🛑
✍️ अहमदनगर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

अहमदनगर :- नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असतांनाच तेथील डॉक्टर गणेश शेळके यांनी कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टर गणेश शेळके यांनी एक सुसाईड नोट लिहिली होती.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी मधील तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या करंजी उपकेंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू होते. दरम्यान उपकेंद्रावर समुदाय अधिकारी म्हणून रुजू असलेले डॉ. गणेश शेळेके हे तणावाखाली असल्याचे दिसत होते. लसीकरण सुरू असतांना त्यांनी तेथील एका कर्मचार्‍याला कागद, पेन मागितला. त्यानंतर त्यांनी उपकेंद्रातील त्यांच्या दालनाचा आतून दरवाजा बंद करून घेतला.

बराचवेळ झाल्यानंतरही डॉ. शेळके हे दरवाजा उघडत नसल्याने त्यांना आवाज दिला. मात्र तरीही काहीही प्रतिसाद न आल्याने तेथील कर्मचार्‍यांनी दरवाजा तोडून पाहिले. त्यावेळी डॉ. गणेश शेळके यांनी दालनातील छताच्या फॅनला गळफास घेतल्याचे दिसले.
आत्महत्येपूर्वी डॉक्टरांनी एक सुसाईड नोट लिहिली आहे. ज्यामध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून, अतिरिक्त कार्यभार देने, वेळेवर पेमेंट न करणे आणि वेळो-वेळी धमकी देने या कारणास्तव मी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

या प्रकरणाची खबर पाथर्डी पोलिसांना देण्यात आली असून घटनास्थळी पोलीस दाखल झालेला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करत आहेत.⭕

Previous articleबारामतीतील बर्‍हाणपूर येथील उपमुख्यालयात पोलिसांच्या 300 जागा भरल्या जाणार..!
Next articleपिंपरीत तरुणांची नागरिकांना कोयत्यानं मारहाण; पोलिसांनी काढली गावगुंडाची धिंड 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.