Home महाराष्ट्र पिंपरीत तरुणांची नागरिकांना कोयत्यानं मारहाण; पोलिसांनी काढली गावगुंडाची धिंड 🛑

पिंपरीत तरुणांची नागरिकांना कोयत्यानं मारहाण; पोलिसांनी काढली गावगुंडाची धिंड 🛑

179
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 पिंपरीत तरुणांची नागरिकांना कोयत्यानं मारहाण; पोलिसांनी काढली गावगुंडाची धिंड 🛑
✍️ पिंपरी चिंचवड 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पिंपरी चिंचवड :- पिंपळे निलख परिसरात दोन तरुणांनी दारू पिऊन रस्त्यावर जबरदस्त राडा घातला होता. हातात कोयता घेऊन त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना विनाकारण मारहाण केली होती. दरम्यान येथील एका नागरिकानं या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच या गावगुंडांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी आरोपींना त्याच रस्त्यावरून नेऊन त्यांची धिंड काढली आहे. या दोन्ही घटनांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

प्रतीक खरात आणि चेतन जावरे असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. दोन दिवसांपूर्वी आरोपींनी दारू पिऊन पिंपळे निलखच्या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना विनाकारण मारहाण केली होती. हातात कोयता घेऊन त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली होती. सोमवारी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक करून दोघांची त्याच रस्त्यावर नेऊन धिंड काढली आहे.मात्र याबाबत सांगवी पोलिसांना विचारलं असता, आरोपींना घेऊन घटनास्थळ पाहण्यासाठी गेल्याचा दावा केला आहे. दरम्यान कुणीतरी घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे गावगुडांची धिंड काढली की केवळ घटनास्थळाची पहाणी केली, याबाबत संभ्रम तयार झाला आहे.

पिंपरी चिंचवड परिसरातील पिंपळे निलख भागात दोन मद्यधुंद अवस्थेतील तरुणांनी दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी रस्त्यावरून प्रवास नागरिकांच्या गाड्या अडवून त्यांच्यावर विनाकारण हल्ला केला होता. प्रतीक संतोष खरात आणि चेतन जावरे अशी हल्लेखोर तरुणांची नावं आहेत. दोघांतील एका तरुणाच्या हातात कोयता होता. त्यांनी कोयत्यानं काही नागरिकांच्या वाहनावर हल्ला केल्याचं देखील व्हिडीओमध्ये दिसत आहे. दोन्ही आरोपींना सध्या ताब्यात घेतलं असून न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.⭕

Previous articleलसीकरण सुरू असतानाच डॉक्टरची आत्महत्या; सुसाईड नोट आली समोर, वाचा काय होतं कारण. 🛑
Next articleसरपंच ते भावी मंत्री, कसा आहे कपिल पाटलांचा राजकीय प्रवास 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here