Home पुणे कात्रज दूध संस्था पुणे संचालक पदी निवड झालेले श्री स्वप्नील ढमढेरे यांचा...

कात्रज दूध संस्था पुणे संचालक पदी निवड झालेले श्री स्वप्नील ढमढेरे यांचा शिक्रापूर पाबळरोड व्यापारी यांच्याकडून सत्कार

68
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220415-WA0178.jpg

शिक्रापूर प्रतिनिधी राकेश पाटील
कात्रज दूध संस्था पुणे संचालक पदी निवड झालेले श्री स्वप्नील ढमढेरे यांचा शिक्रापूर पाबळरोड व्यापारी यांच्याकडून सत्कार
कात्रज दूध संघाच्या नवनिर्वाचित संचालक पदी स्वप्निल बाळासाहेब ढमढेरे यांची निवड झाली त्याबद्दल शिक्रापूर पाबळ रोड येथील समस्त व्यापारी यांचे वतीने हिरवे कॉम्प्लेक्स शिक्रापूर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा माजी शिरूर तालुका अध्यक्ष अनिल नवले, भाजपाचे युवा कार्यकर्ते रोहित जी खैरे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सिद्धेश हिरवे, हनुमान यात्रा कमिटी शिक्रापूर अध्यक्ष राजाभाऊ करंजे, अण्णासाहेब वाबळे ओंकार शेठ हिरवे, ऋषिकेश शेठ तकटे, विजय शेठ जगताप, पत्रकार निलेशराव जगताप, मुकेश शेठ अग्रवाल, श्री कदमसाहेब, बाळासाहेब कुलकर्णी, गणेशशेठ पटेल, राहुल शेठ जाधव, प्रकाश शेठ चौधरी, किरण शेठ गोरे, ओंकार शेठ साबळे, अंबादास शेठ वैष्णव, सागर गोरे अर्जुन पिसाळ, सद्दाम शेख, प्रकाश शेठ पटेल आदी अनेक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा युवा मोर्चाचे माजी शिरूर तालुका अध्यक्ष अनिल नवले होते प्रास्ताविक ओबीसी महासंघ पश्चीम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सिध्देश हिरवे यांनी केले राजेंद्र करंजे, विजयशेठ जगताप व व्यापारी यांनी मनोगत केले व ओंकार हिरवे यांनी सर्वांचे उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले सर्व व्यापारी बांधवांनी स्वप्निल ढमढेरे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या सर्वांनी उपस्थित राहून सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार स्वप्नील ढमढेरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here