Home गुन्हेगारी उत्तराखंडमधील दुर्दैवी घटणेत १५० जण बेपत्ता त्यापैकी १० मृतदेह सापडली

उत्तराखंडमधील दुर्दैवी घटणेत १५० जण बेपत्ता त्यापैकी १० मृतदेह सापडली

283
0

राजेंद्र पाटील राऊत

उत्तराखंडमधील दुर्दैवी घटणेत १५० जण बेपत्ता त्यापैकी १० मृतदेह सापडली

उत्तराखंड मधील जोशीमठ तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना आज सकाळी घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला मोठा महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जोशीमठ तालुक्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळी १०.५५ वाजता ही दुर्घटना घडली. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हिमकडा कोसळला. त्यामुळे या धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यातच या धरणाचा कडाही तुटल्याने या ठिकाणी पाणीच पाणी झाले असून अनेक घरे व १५० माणसे वाहून गेलेली आहेत त्यापैकी १० मृतदेह सापडले आहेत निसर्गाच्या या प्रकोपामुळे उत्तराखंडमध्ये एकच हाहाकार माजला असून या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleदेगलूर येथे शेतकऱ्यांचा चक्काजाम आंदोलन यशस्वी               
Next articleगुन्हेगाराला वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी येरवडा जेल बाहेर आतषबाजी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here