Home नांदेड एकलारा पंचायत समिती गणात सर्वसाधारण महिला आरक्षण असल्यामुळे कॉंग्रेस पक्षाने व मा...

एकलारा पंचायत समिती गणात सर्वसाधारण महिला आरक्षण असल्यामुळे कॉंग्रेस पक्षाने व मा आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेबांनी आदेश दिल्यास पंचायत समिती पुर्ण तयारीनिशी लढवणार- आकाश पाटील उंद्रीकर

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20220730-WA0002.jpg

एकलारा पंचायत समिती गणात सर्वसाधारण महिला आरक्षण असल्यामुळे कॉंग्रेस पक्षाने व मा आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेबांनी आदेश दिल्यास पंचायत समिती पुर्ण तयारीनिशी लढवणार-
आकाश पाटील उंद्रीकर
(महासचिव युवक काँग्रेस मुखेड)

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील जिल्हा परिषद एकलारा सर्कल ओबिसी महिलेला आरक्षित घोषित करण्यात आले तर एकलारा पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलेला घोषित करण्यात आले.एकलारा‌ पंचायत समिती गणात कॉंग्रेस पक्षाने व मा आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब,मा जि प अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर साहेब यांनी आदेश दिल्यास पंचायत समिती निवडणूक तालुक्यातील व सर्कलमधील सर्व जेष्ठ नेते यांच्या आशीर्वादाने व सक्रिय युवक काँग्रेसचे विश्वासु पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने येणारी निवडणूक लढविणार असे मत युवक काँग्रेसचे महासचिव आकाश पाटील वडजे उंद्रीकर यांनी व्यक्त केले आहे.
मागील अनेक वर्षापासुन एकलारा सर्कल मध्ये कॉंग्रेस पक्षातील विविध उपक्रम आंदोलने, रास्तारोको आंदोलन मोर्चे, विविध अभियानात सक्रीय सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात त्यांचे एकलारा सर्कल मध्ये काँग्रेस पक्षाचे विचार सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी व काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी त्यांचं मोलाचं योगदान आहे. काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान, युवक काँग्रेस सदस्य अभियान, रक्तदान शिबिर असो किंवा शक्ती ॲपच्या माध्यमातून नागरिकापर्यंत पक्षाचे ध्येयधोरण पोहोचण्यासाठी ते अग्रेसर असतात. त्यांचे एकलारा सर्कल मधील जनसंपर्क पाहता,पक्षावरील असलेले एकनिष्ठता व केलेल्या कार्याचे योगदान पाहता आकाश पाटील हेच या पदाचे प्रबळ दावेदार आहेत.
येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये आकाश पाटील उंद्रीकर यांच्या सौभाग्यवती पत्नीस कॉंग्रेस पक्षाने तिकीट देऊन उमेदवारी घोषित करावी.
अशा जनसामान्य युवकांना निवडणुकीत संधी मिळावे म्हणून मा मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब व मा आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब,मा जि प अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर साहेब यांच्याकडे जनतेतून मागणी होत आहे. या मागणीचा विचार करून काँग्रेस पक्ष‌ श्रेष्ठींनी अशा युवकांना संधी देऊन काँग्रेस पक्ष बळकट करुन 2024 च्या विधानसभेची तयारी करावी असे मत जनतेतून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here