Home नाशिक कळवण तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार

कळवण तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार

57
0

आशाताई बच्छाव

IMG-20221225-WA0000.jpg

कळवण तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार
युवा मराठा न्यूज प्रतिनिधि :- सागर (गणेश) कांदळकर
बाळासाहेबांच्या शिवसेनेत शरद पगार आणि सागर जगताप यांची एंट्री !

 

कळवण : कळवण तालुक्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ला रामराम ठोकत बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) याकडे युवक वर्ग आकर्षित होत असून यामुळे दोन्ही काँग्रेसची युवाशक्ती कमी होत चालल्याचे दिसून येत आहे. कालच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी युवक तालुका अध्यक्ष शरद पगार यांची बाळासाहेबांची शिवसेना कळवण तालुकाप्रमुखपदी तर काँग्रेसचे शहराध्यक्ष सागर जगताप यांची कळवण शहरप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.

शिंदे गट म्हणजे अर्थातच बाळासाहेबांची शिवसेना सध्या सर्वत्र आपली क्रेझ निर्माण करीत असून काल झालेल्या नासिक येथील बैठीकीस हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद

दिघे यांच्या आशिर्वादानें त्यांचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच खा. श्रीकांत शिंदे सचिव संजय मोरे, संपर्क नेते संजय मसिळकर, पालकमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, आ. सुहास कांदे, संपर्क प्रमुख जयंत साठे, संजय बच्छाव, राजेंद्र

बाळासाहेबांची

सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नासिक जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक तालुकाध्यक्ष शरद पगार यांची बाळासाहेबांची शिवसेना कळवण तालुकाप्रमुख पदी तर उपतालुकाप्रमुख अनिल गांगुर्डे यांची व काँग्रेसचे

शहराध्यक्ष सागर जगताप यांची कळवण शहरप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण उपजिल्हाप्रमुख पदी जितेंद्र पगार यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी मानूर ग्रामपंचायत माजी उपसरपंच नरेंद्र पवार, निलेश पाकळे, दीपक पगार, किरण पगार आदी उपस्थित होते. कळवण तालुक्यात शिवसेना, युवा सेना यातून लवकरच काही पदाधिकारी व शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती शरद पगार व सागर जगताप यांनी दिली असून बहुतांश पक्षातील विशेषतः राष्ट्रवादी व शिवसेना मधील पदाधिकारी आपल्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. परिणामी, आगामी काळात बाळासाहेबांची शिवसेना तालुक्यात जोर धरू लागल्यास नवल वाटायला नको.

Previous articleभाऊलाल तांबडेंचा गनिमीकावा बाळासाहेबांच्या शिवसेनेला गड सर करून देणार!
Next articleमालेगाव तालुका ग्रामसेवक संघटना अध्यक्षपदी  श्री.टी. एम.बच्छाव तर सचिवपदी प्रदिप खताळ यांची निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here