Home नाशिक भाऊलाल तांबडेंचा गनिमीकावा बाळासाहेबांच्या शिवसेनेला गड सर करून देणार!

भाऊलाल तांबडेंचा गनिमीकावा बाळासाहेबांच्या शिवसेनेला गड सर करून देणार!

38
0

आशाताई बच्छाव

IMG-20221225-WA0005.jpg

भाऊलाल तांबडेंचा गनिमीकावा बाळासाहेबांच्या शिवसेनेला गड सर करून देणार!
युवा मराठा न्यूज . प्रतिनिधी सागर (गणेश) कांदळकर
दिंडोरी तालुका हा आदिवासी तालुका म्हणून परिचित असला तरी बागायती शेती आणि कारखानदारीमुळे सधन वर्गही तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहे. तालुक्याच्या राजकारणात प्रभाव असलेल्या राजकीय पुढाऱ्यांमध्ये या सधन वर्गाचेच वर्चस्व दिसते. परिणामी सामान्य माणूस प्रत्यक्ष प्रक्रियेपासून दूर ठेवला जातो, अशी मानसिकता निर्माण झालेल्या या तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना या नव्या राजकीय पक्षाविषयी सहानुभूती निर्माण होऊ शकते. म्हणूनच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, तालुक्याचे सहकार महर्षी श्रीराम शेटे, माजी आमदार रामदास चारोस्कर आणि काही प्रमाणात केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या नेतृत्व गर्दीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे कशाप्रकारे स्वतःचे नेतृत्व जन माणसात रुजवतात, यावरच तालुक्याचे राजकीय समीकरण अवलंबून आहे.

‘ महानगरपालिका, जिल्हा मधरिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार, अशी चर्चा सुरु झाल्याने सर्व राजकीय पक्षांच्या पातळीवर सोयीनुसार हालचाली गतिमान झाल्या आहेत. यातच शिंदे गटाला आपले अस्तित्व सिद्ध करण्याचे आवाहन उभे असल्याने जिल्ह्यात शिंदे गटाचे अस्तित्व प्रबळपणे उभे करण्याचे आवाहन जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांनी स्वीकारले असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका व नगरसेवकांचा होत असलेला प्रवेश शिंदे गटासाठी कितपत लाभदायक ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर शिंदे गटाने आपले पहिला अस्तित्व सिद्ध करण्यासाठी राज्यभरात चळवळ तत्वावर योजना आखली. त्यावेळी नाशिक जिल्ह्याची जबाबदारी शिवसेनेचे धडाडीचे व आक्रमक व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेल्या पूर्व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आताचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तांबडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तळागाळात काम करत जिल्हाप्रमुख पदापर्यंत आपले अस्तित्व सिद्ध करणारे भाऊलाल तांबडे यांच्याकडे संघटन कौशल्य असल्याने ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली गेल्याच्या प्रतिक्रिया

व्यक्त होत आहेत.

हे खरं असलं तरी राजकारणात काल काय होते, यापेक्षा वर्तमानात यावेळीही दिसला. त्यांना आपला करिष्मा दाखवून येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांत ही निवड सार्थ ठरवावी लागणार

आहे. त्यादृष्टीने बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांनी प्रत्येक तालुक्यात पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तयारी सुरू करीत टप्पा यशस्वी गाठला आहे. स्वतालुका म्हणजेच दिंडोरी तालुक्यात आपले मूळ पक्के करण्यावर त्यांचा अधिक कटाक्ष दिसत आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत पश्चिम पट्ट्यातील जेष्ठ कार्यकर्ते सदाशिव गावित यांचा बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश केला. अहिवंतवाडी जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व त्यांनी केले आहे. महिला आरक्षण निघाल्याने त्यांनी आपली सुन रोहिणी गावित यांची निवडणुकीत उमेदवारी घेत निवडणूक जिंकली.

Previous articleनिफाड सहकारी कारखाना भव्य नूतनीकरण सोहळा.
Next articleकळवण तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here