Home गुन्हेगारी नांदगाव पोलिसांनी आवळ्या मोटार सायकल चोराच्या मुसक्या. 

नांदगाव पोलिसांनी आवळ्या मोटार सायकल चोराच्या मुसक्या. 

50
0

आशाताई बच्छाव

IMG-20221112-WA0074.jpg

नांदगाव पोलिसांनी आवळ्या मोटार सायकल चोराच्या मुसक्या.
नांदगाव शहरात मोटार सायकल चोरीच्या घटना वाढत होत्या.परंतु पोलिसांनी प्रयत्न करूनही चोर ताब्यात येत नव्हते.मात्र एका घटनेत मोटार सायकल चोराच्या मुसक्या आवळण्यात नांदगाव पोलिसांना यश आले आहे.ताब्यात घेतलेल्या चोरट्याकडून अनेक गुन्ह्यांचा तपास लागण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. पळून जाण्याचा प्रयत्न करताना पाठलाग करून तळवाडे येथील वीटभट्टी जवळ झडप घालत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.चोरट्यांना पोलिसी खाक्या दाखवितात त्यांनी चोरी केलेली मोटार सायकल ताब्यात घेतली. चोरीला गेलेली मोटार सायकल नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेत चोराला जेरबंद केले आहे. या प्रकरणी रामचंद्र परशराम आहेर यांच्या तक्रारी वरून,आरोपी गणेश शिवाजी सानप याच्या विरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं.व कलम- ३४२ भा.द.वि. ३७९ प्रमाणे ४ यास अटक केली असुन अटक करण्यात आली आहे.हा सर्व प्रकार मानसी कलेक्शन जवळ नांदगाव येथे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
हिरो स्प्लेडंर कंपनीची लाल रंगाची एमएच ४१ए डब्ल्यु १८९८ मोटार सायकल 20 हजार किमतीची असल्याचे समजते.पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली,तपासी हवालदार मधुकर,सुर्यवंशी पोलीस हवालदार
रवींद्र चौधरी ,संदीप बोडखे,अनिल शेरेकर,सुनील कुऱ्हाडे,आदींनी कार्यवाही केली आहे.(प्रतिनिधी अनिल धामणे नांदगांव नाशिक)

Previous article50 लाखांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल
Next articleसंग्रामपुर तालूक्यात बंदी असलेला गुटखा महागला;टपरी चालक व ग्राहकांमध्ये शाब्दिक वाद तर, गुटखा व्यापाऱ्यांची मात्र जत्रा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here