आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: घटनेत राजकीय पक्षाची विस्तृत व्याख्या नाही! शिवसेना गट व शिंदे गट यांच्यामध्ये चिन्हावरून चाललेल्या कोर्टाच्या वादात निवडणूक आयोगाकडे शिंदे घटाने मूळ पक्ष आमचाच आहे असा दावा केला होता. याच्यावरती कोर्टामध्ये चालू असताना शिंदे गटाचे वकील महेश साहेब यांनी सांगितले की मूळ शिवसेना पक्ष आमचा आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल यांनी सांगितले की शिंदे गटाने पक्षाचा आदेश धुडकावून लावला व भाजपला मतदान केले .अशा फुटीर गटाला पक्षाचा चिन्ह देण्यात येऊ शकत नाही. त्यांना कुठल्यातरी पक्षात विलीन हवाच लागेल असे सिबल यांनी सांगितले. त्याचबरोबर फुटीर गटाला मान्यता मिळणार नाही असे त्यांनी सांगितले. घटनेमध्ये राजकीय पक्षांची विस्तृत व्याख्याच नाही असे त्यांनी सांगितले. शिंदे गट हा कुठल्याही पक्षात विलीन होणार नाही असे स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. शिवसेनेने सांगितले की आयोगाच्या कामकाजाबाबत कुठलीही स्पष्टता नाही ती यावी अशी विनंती. मूळ प्रकरणावर आधी निर्णय व्हायला पाहिजे असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पक्षात नसताना निवडणूक आयोगाकडे जाणे हे कितपत योग्य आहे असे त्यांनी कोर्टाकडे अपील केली .त्याचबरोबर सिबल यांनी सांगितले की शिंदे यांचा अपात्रेचा मुद्दाही अजून मिटलेला नाही. विधानसभेचे अध्यक्ष त्यांचेच आहेत त्यामुळे त्यांचे अधिकार कितपत मान्य होतील हेही आम्हाला मान्य नाही. एकंदरच काय तर मूळ पक्षात काही बदल होणार नाहीत. धनुष्यबाण हे चिन्ह मूळ शिवसेना पक्ष यांचाच राहील असे त्यांनी सांगितले.