Home पुणे टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयांमध्ये स्वररंग युवक महोत्सवाचे आयोजन

टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयांमध्ये स्वररंग युवक महोत्सवाचे आयोजन

68
0

आशाताई बच्छाव

IMG-20220925-WA0064.jpg

टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयांमध्ये स्वररंग युवक महोत्सवाचे आयोजन
पुणे प्रतिनिधी उमेश पाटील
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विभागीय युवक महोत्सव खडकी खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विभागीय स्वररंग युवक महोत्सवाचे बुधवार दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे यांनी दिली खडकी शिक्षण संस्थेच्या टी.जे महाविद्यालयात प्रथमच भव्य स्वरूपात स्वरूपात भव्य स्वरूपात संपन्न होणाऱ्या या युवक महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध अभिनेते व चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्री प्रवीण तरडे यांना निमंत्रित केले आहे खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री .कृष्णकुमार गोयल हे अध्यक्षस्थानी तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर संतोष परचुरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या युवक महोत्सवामध्ये पुणे विद्यापीठांतर्गत 42 महाविद्यालये सहभागी होणार असून वैयक्तिक शास्त्रीय गायन /वादन वैयक्तिक नृत्य /समूह नृत्य प्रश्नमंजुषा, एकांकिका, मूकअभिनय, मिमिक्री, मातीकला, व्यंगचित्र रांगोळी, छायाचित्रण, कोलाज ,चित्रकला, वादविवाद ,एकपात्री प्रयोग, वाद्य संगीत इत्यादी स्पर्धाच्या माध्यमातून विद्यार्थी कलावंतांना आपली कला अविष्कृत करता येणार आहे. या स्पर्धेमध्ये निवडलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ पातळीवरील युवक महोत्सवांमध्ये प्रवेश मिळेल. याच विद्यार्थी कलावंतांना पुढे राज्यस्तरीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवाकरिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात समावेश करण्यासाठी प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे ,अशी माहिती
विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. परचुरे यांनी दिली. विद्यार्थी विकास मंडळाच्या विद्यार्थी विकास अधिकारी प्रा गौरी माटेकर आणि स्वररंग युवक महोत्सवाचे समन्वयक प्रा महादेव रोकडे यांचेकडे या महोत्सवाची जबाबदारी आहे. प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांचे उपस्थितीत पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे यांनी महाविद्यालयात उपस्थित राहून महोत्सवाच्या संपूर्ण आयोजन व पूर्वतयारीचा आढावा घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here