Home नाशिक निताणे येथे शिक्षण परिषद संपन्न.

निताणे येथे शिक्षण परिषद संपन्न.

125

आशाताई बच्छाव

IMG-20220807-WA0027.jpg

निताणे येथे शिक्षण परिषद संपन्न.
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे
दिनांक 6. 8. 22 रोजी महाराष्ट्र शासन , शालेय शिक्षण विभाग , डायस, यांच्या संयुक्त विद्यमाने निताणे येथे जिल्हा परिषद शाळा एकदिवसीय पुष्प दुसरे शिक्षण परिषद संपन्न.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात भर पडावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध धोरणात्मक विचार सरणीला अनुसरून या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या शिक्षण परिषदेचे उद्घाटक म्हणून प्रवीण वाघ हे होते. माहे ऑगस्ट शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक प्रमोद घरटे यांनी मांडले. या परिषदेचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन म्हणून प्रेमानंद घरटे यांनी केले. तसेच विषयानुसार प्रेमानंद घरटे, योगेश खरे , मनोज पवार यांनी तासिका नुसार अध्ययन व अध्यापन या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच तीन ते सहा वयोगटासाठी इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गासाठी सफल मार्गदर्शन या परिषदेत देण्यात आले तसेच पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विषय शिक्षकांना मार्गदर्शन व्हावे या हेतूने संबंधित शिक्षकांनी मार्गदर्शन केले. तसेच या शिक्षन परिषदेसाठी अंगणवाडी, केंद्र शाळा, प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी कठोर मेहनत घेऊन ही शिक्षण परिषद योग्य रीतीने पार पाडले.

Previous articleशिरुर शालेय व्यवस्थापन अध्यक्षपदी बालाजी पाटील
Next articleकर्मवीर शिवराम दादाजी हिरे याची जयंती व पुण्यतिथी साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.