Home Breaking News मुंबईचा राजा ” गणेश गल्लीतील मंडळाने घेतला मोठा निर्णय ! २२ फुटांऐवजी...

मुंबईचा राजा ” गणेश गल्लीतील मंडळाने घेतला मोठा निर्णय ! २२ फुटांऐवजी गणेश मूर्ती ४ फुटांची असणार ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

107
0

🛑 ” मुंबईचा राजा ” गणेश गल्लीतील मंडळाने घेतला मोठा निर्णय ! २२ फुटांऐवजी गणेश मूर्ती ४ फुटांची असणार 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕जगभरात कोरोना व्हायरसचा फैलाव झपाट्याने होत असून महाराष्ट्रही कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. यामुळे या विषाणूचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी यंदा अनेक धार्मिक सण- उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यावर मनाई करण्यात आली आहे. यामुळे मुंबईत सर्वात महत्त्वाचा आणि मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणारा गणेशोत्सव देखील यंदा साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. याला मुंबईतील अनेक मोठमोठ्या गणेश मंडळांनी पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे ‘मुंबईचा राजा’ म्हणून ओळख असणा-या गणेश गल्लीतील मंडळाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

यंदा मुंबईच्या राजाची मूर्ती ही 22 फूटांऐवजी 4 फूटांची असणार आहे.

मुंबईच्या राजाची ही भव्यदिव्य मूर्ती हा आकर्षणाचा विषय असतो. त्यात वेगवेगळ्या रुपातील राजाची मूर्ती डोळे दिपवून टाकणारी असते. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे. यंदा मुंबईच्या राजाची मूर्ती ही 4 फूटाची असणार असून त्याचे कृत्रिम तलावात विसर्जन केले जाईल अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल परब
यांनी दिली आहे.
दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गणपती मंडळामध्ये चर्चा झाली होती. कोरोनाच्या संकटामुळे मंडळाने हा निर्णय घेतला असून लहान मूर्ती आणून उत्सवाची उंची वाढवणार असल्याची प्रतिक्रिया मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांनी दिली. तसंच स्थानिकांनी सोशल डिस्टन्स पाळून गणपती बाप्पाचं दर्शन देणार असून इतरांसाठी मंडळ ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करणार आहे, अशी माहितीही स्वप्निल परब यांनी दिली….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here