Home बुलढाणा आमदार कूटे तूम्हाला शोधू कूठे नागरिकांचा सवाल साहेब, या रस्त्याने तुम्ही एकदा...

आमदार कूटे तूम्हाला शोधू कूठे नागरिकांचा सवाल साहेब, या रस्त्याने तुम्ही एकदा याच शेतकऱ्यांची प्रशासनाला आर्त हाक

79
0

आशाताई बच्छाव

IMG-20220925-WA0048.jpg

आमदार कूटे तूम्हाला शोधू कूठे नागरिकांचा सवाल

साहेब, या रस्त्याने तुम्ही एकदा याच
शेतकऱ्यांची प्रशासनाला आर्त हाक

संग्रामपुर : तालुक्यातील वानखेड येथील रिंगणवाडीला जोडणाऱ्या रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेले काही दिवस येत असलेल्या संततधार पावसाने या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून रस्त्यातून जाणे-येणे अडचणीचे बनले आहे. रस्त्त्यात सर्वत्र चिखल तयार झाल्याने बैलगाडी तर दूर पायी चालणेसुद्धा दिव्य बनले आहे. यामुळे या मार्गावर शेती असलेले शेतकरी हे अधिकाऱ्यांना रस्त्याने चालून दाखवण्याचे आवाहन करू लागले आहेत.
तालुक्याच्या राजकारणात वानखेड गावाची मोठी भूमिका राहलेली आहे. पण विकासाच्या बाबतील राजकीय पक्षांनी लक्ष न दिल्याने प्रामुख्याने शेतकऱ्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत . मागील अनेक वर्षांपासून वानखेड-रिंगणवाडी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केल्या जात आहे. या रस्त्याच्या आजूबाजूने सुपिक जमीन असून सिंचनाच्या सुविधासुद्धा आहेत. मात्र, केवळ रस्ता नसल्याने शेतकरी हे पावसाळयाच्या चार महिन्यात भाजीपाला, फळपिके घेऊ शकत नाहीत. कारण या काळात रस्त्याने बैलगाडी तर दूर साधे पायीसुद्धा सरळपणे चालता येत नाही.
हा रस्त्या करण्याबाबत आजवर राजकीय नेत्यांनी केवळ आश्वासने दिली आहेत. परंतु कुणीही आपला शब्द पाळलेला नाही. आता पावसाच्या दिवसात या रस्त्याची अत्यंत बिकट स्थिती बनलेली आहे. शेतकऱ्यांना कुठलेही वाहन नेता येत नाही. त्यामुळे शेतमाल कसा आणायचा हा पेच आहे.  विशेष म्हणजे रिंगणवाडी गावकऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांसाठी वानखेड येथील केंद्रात जोडलेले आहे. आज स्वातंत्र्यांची ७५ वर्षे झाल्याचा गवगवा करीत अनेक कार्यक्रम केले जात आहेत. मात्र, या ७५ वर्षात शेतकऱ्याला शेतापर्यंत जायला चांगला रस्ता मिळालेला नाही, ही वस्तुस्थिती लपून राहलेली नाही. आता तरी कुणी याकडे लक्ष देईल का, असा प्रश्न वानखेड, रिंगणवाडी गावातील नागरिक विचारत आहेत. अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा परिसरातील शेतकरी यांनी दिला आहे

Previous articleराष्ट्र नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रम आयोजित
Next articleटिकाराम जगन्नाथ महाविद्यालयांमध्ये स्वररंग युवक महोत्सवाचे आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here