Home नाशिक वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर साई स्वराज्य संस्थेच्या वतीने सन्मानित

वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर साई स्वराज्य संस्थेच्या वतीने सन्मानित

224

आशाताई बच्छाव

IMG-20230922-WA0086.jpg

वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर साई स्वराज्य संस्थेच्या वतीने सन्मानित

स्वराज्य गृप ने घेतली वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसाराच्या कार्याची दखल

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचे प्रचार व प्रसाराचे कार्य करणारे वारकरी मंच महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रसिद्धीप्रमुख तथा महाराष्ट्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ रामायणाचार्य, भागवताचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, गुणीजन त्याचप्रमाणे उच्चशिक्षित अधिकारी वर्ग ,शासकीय, निमशासकीय अधिकारी, तसेच वारकरी संप्रदायातील निष्ठावान वारकऱ्यांच्या सहयोगातून सुरू असलेल्या विठ्ठल रखुमाई अध्यात्मिक विचार मंच मुख्य संचालक रामभाऊ विठ्ठलराव आवारे सर यांच्या वारकरी संप्रदायातील प्रचार प्रसाराची उल्लेखनीय कार्याची दखल घेत स्वराज्य ग्रुपचे संस्थापक तसेच साई स्वराज्य फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुनील उमाजी शिंदे यांच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ सुजित गुंजाळ साहेब ,मा आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या धर्मपत्नी सौ दुर्गाताई तांबे, सौ नंदाताई तांबे, सुप्रसिद्ध लेखक समीर देवडे सर,मा सभापती शिवा पाटील सुरासे, वनसगाव विद्यालयाचे प्राचार्य सी डी रोटे,पर्यवेक्षक के बी दरेकर, तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ दादा शिंदे, धनंजय डुंबरे,मनेष शिंदे, डॉ योगेश डुंबरे, डॉ उत्तमराव शिंदे, स्वराज्य ग्रुपचे सुनील शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे आदींच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
वनसगाव तालुका निफाड येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पत्रकार रामभाऊ आवारे यांना सन्मान पत्र, सन्मान चिन्ह,शाल, पुष्पगुच्छ व आभार पत्र देऊन गौरविण्यात आले आहे.