• Home
  • राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रम आयोजित

राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रम आयोजित

आशाताई बच्छाव

IMG-20220924-WA0008.jpg

राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रम आयोजित
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे युवा मराठा न्युज नेटवर्क
दि.२२ आज मुक्रमाबाद ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी शंकर येवते साहेब मुखेड यांनी प्रलंबित विवाह नोंदणी , जन्म नोंदणी, मृत्यू नोंदणी ,प्रमाणपत्राचे वाटप करून नोंदणी केव्हा करायच्या आणि किती कालावधीत करायची व प्रलंबित राहण्याचे कारणे कोणते याचं योग्य मार्गदर्शन माननीय श्री येवते साहेब यांच्याकडून झालेला आहे. त्याचबरोबर लंपी आजारावर लसीकरण मोहीम चालू आहे ती मोहीम मुक्रमाबाद येथे पशुवैद्यकीय दवाखाना येथे उद्यापासून लसीकरण मोहीम चालू करण्यात येत आहे याबाबत त्यांच्याकडून झाले मार्गदर्शन त्यांच्याकडून झाले. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले सरकार सेवा केंद्र तालुका व्यवस्थाक विजय घाळे, ग्रामविकास अधिकारी संजय पाटील,अंतेश्वर पाटील,संतोष गुमडे,शुभम भंगे व
सरपंच प्रतिनिधी बालाजीअप्पा बोधने
उपसरपंच सदाशिव बोयेवार ग्रामपंचायत सदस्य शंकरअप्पा खंकरे,बाबुराव मंत्रे, व मुक्रमाबाद येथील सर्व गावकरी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment