Home Breaking News 🛑 खुशखबर! मुंबईत नोकऱ्यांचे प्रमाण वाढले 🛑

🛑 खुशखबर! मुंबईत नोकऱ्यांचे प्रमाण वाढले 🛑

142
0

🛑 खुशखबर! मुंबईत नोकऱ्यांचे प्रमाण वाढले 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 13 ऑक्टोबर : ⭕ मुंबईत करोनाचा कहर अद्यापही पुरता कमी झाला नसला तरी दुसरीकडे हळूहळू जीवन पूर्वपदावर येत आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. हजारो लोक बेरोजगार झाले. पण आता एक आशादायी चित्र समोर आले आहे. मुंबईत सप्टेंबर २०२० महिन्यात नोकऱ्या देण्याचे प्रमाण ऑगस्टच्या तुलनेत २४ टक्क्यांनी वाढले आहे. या नोकऱ्या विशेषकरून फार्मास्युटिकल कंपन्या आणि शिक्षण क्षेत्रातील आहेत.

सप्टेंबर महिन्यात, मुंबईत १,७५५ नोकऱ्या दिल्या गेल्या. ऑगस्टमध्ये ही संख्या १,४१३ होती. ही वाढ २४ टक्के आहे. नोकरी जॉबस्पीक इंडेक्सने हे निरीक्षण नोंदवले आहे.

नोकरी जॉबस्पीक हा नोकरीसंदर्भातील घडामोडींची नोंद ठेवणारा मासिक निर्देशांक आहे. नौकरी डॉट कॉम या जॉब पोर्टलच्या नोंदणीवर तो आधारलेला आहे. यानुसार, फार्मा कंपन्यांमधील नोकरीची उलाढाल ४४ टक्क्यांनी वाढली आहे. FMCG क्षेत्रात ४३ टक्के, शिक्षण आणि अध्यापन क्षेत्रात ४१ टक्के तर आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये ३२ टक्के वाढ झाली आहे.

तसेच, जसजसे अनलॉकचे टप्पे वाढत आहेत, म्हणजेच जसजसा लॉकडाऊन उठत आहे तसतसे विविध क्षेत्रात नोकऱ्यांच्या संधी निर्माण होत आहेत. रिअल इस्टेटमध्ये ४४ टक्के, ऑटोमध्ये २९ टक्के तर हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल्समध्ये ४८ टक्क्यांची वाढ आहे.⭕

Previous article🛑 Flipkart Big Billion Days: सॅमसंग, ओप्पो, रियलमीच्या स्मार्टफोन्सवर बंपर सूट 🛑
Next article*बांबवडेत छत्रपती शिवाजी* *महाराजांचा पुतळा सन्मानाने* *बसविण्यात येणार ,* *पोलिस प्रशासन*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here