Home Breaking News *बांबवडेत छत्रपती शिवाजी* *महाराजांचा पुतळा सन्मानाने* *बसविण्यात येणार ,* *पोलिस प्रशासन*

*बांबवडेत छत्रपती शिवाजी* *महाराजांचा पुतळा सन्मानाने* *बसविण्यात येणार ,* *पोलिस प्रशासन*

95
0

*बांबवडेत छत्रपती शिवाजी* *महाराजांचा पुतळा सन्मानाने* *बसविण्यात येणार ,*
*पोलिस प्रशासन*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)*

कोल्हापूर जिल्ह्यातील
शाहूवाडी तालुक्यात बांबवडे येथील बसस्थानकासमोर काल रात्री बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा सायंकाळी उशिरा पोलीस प्रशासनाकडून दुग्धाभिषेक व विधिवत पूजा करून काढण्यात आला होता.
विशेष म्हणजे गावात कोणाचाही या पुतळ्याला विरोध नसला, तरी शासनाची परवानगी घेऊनच हा पुतळा सन्मानाने बसविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. दरम्यान, गावात रात्री उशिरापर्यंत कसलाही तणाव नसला तरी काही शिवभक्तांनी मलकापूर आणि बांबवडे गावांतील बाजारपेठ उद्या कडकडीत बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.
बांबवडे येथील बसस्थानकासमोर रविवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आल्याने सर्वपक्षीय स्थानिक नेतेमंडळी तसेच अनेक शिवप्रेमी येथे दाखल झाले होते. शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख हेही घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी काही शिवभक्तांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात विधिवत पूजा करून, हा पुतळा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला.
दरम्यान, याबाबत प्रशासकीय परवानगीसाठी प्रयत्न करू, पण सद्यःस्थितीत पुतळा हटविण्यास माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांनीही नकार दिला होता.

Previous article🛑 खुशखबर! मुंबईत नोकऱ्यांचे प्रमाण वाढले 🛑
Next article*खासदार राऊतांनी मराठा समाजाची* *माफी मागावी,* *पंकज जऱ्हाड*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here