• Home
  • *खासदार राऊतांनी मराठा समाजाची* *माफी मागावी,* *पंकज जऱ्हाड*

*खासदार राऊतांनी मराठा समाजाची* *माफी मागावी,* *पंकज जऱ्हाड*

*खासदार राऊतांनी मराठा समाजाची* *माफी मागावी,*
*पंकज जऱ्हाड*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)*

एकीकडे मराठा समाजावर आरक्षणाबाबत अन्याय झाला आहे आणि दुसरीकडे सेनेचे खासदार मराठयांच्या जखमेवर मिठ चोळणेचं काम करत आहेत.
संजय राऊत तुम्हाला एकच इशारा आहे, दरवेळी तुम्ही ‘सामना’च्या अग्रलेखातून आमच्या समाजाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना टार्गेट करता आहात , आम्ही हे खपवून घेणार नाही,
असं मराठा क्रांती मोर्चाचे
समन्वयक जालण्याचे पंकज
जऱ्हाड यांनी म्हटलंय.
ताबडतोब माफी मागा. जर माफी न मागता तुम्ही मराठवाड्यात आलात तर मराठा समाज तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा पंकज जऱ्हाड यांनी दिला आहे.
दरम्यान, जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करण्यासारखी स्थिती नाही, असा टोला संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखातून खासदार छत्रपती संभाजी राजेंना लगावला होता .

anews Banner

Leave A Comment