Home Breaking News *माझे कुटुंब माझी जबाबदारी* *आजपर्यंत 144862 नागरीकांचे सर्व्हेक्षण*

*माझे कुटुंब माझी जबाबदारी* *आजपर्यंत 144862 नागरीकांचे सर्व्हेक्षण*

92
0

*माझे कुटुंब माझी जबाबदारी*
*आजपर्यंत 144862 नागरीकांचे सर्व्हेक्षण*

*कोल्हापूर( मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)*

राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु झालेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत कुटुंब कल्याण केंद्राच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेक्षणाच्या आजच्यादिवशी 33975 घरांचे आणि 144862 इतक्या लोकांची सर्व्हेक्षण करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेअंतर्गत आजच्या दिवशी तपासणी करण्यात आलेल्या तालुक्यातील नागरीकांची कुटुंब कल्याण केंद्र निहाय माहिती आजरा 1387 घरांचे व 4973 नागरिकांचे, भुदरगड 6544 घरांचे व 22250 नागरिकांचे, चंदगड 3285 घरांचे व 13470 नागरिकांचे, हातकणंगले 6880 घरांचे व 32239 नागरिकांचे, करवीर 4333 घरांचे व 19487 नागरिकांचे, पन्हाळा 1884 घरांचे व 8513 नागरिकांचे, शाहूवाडी 992 घरांचे व 3947 नागरिकांचे व शिरोळ- 3859 घरांचे व 17589 नागरिकांचे असे एकूण 29164 घरांचे व 122468 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
नगरपंचायत हातकणंगले 468 घरांचे व 2017 नागरिकांचे, नगरपंचायत इचलकरंजी 3496 घरांचे व 16028 नागरिकांचे, नगरपंचायत पेठवडगाव 135 घरांचे व 670 नागरिकांचे तर नगरपंचायत हुपरी 712 घरांचे व 3679 नागरिकांचे, असे एकूण 4811 घरांचे व 22394 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

Previous article*खासदार राऊतांनी मराठा समाजाची* *माफी मागावी,* *पंकज जऱ्हाड*
Next articleराज्यात विजेच्या कडकडाटा सह मुसळधार पावसाची शक्यता
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here