Home परभणी शिक्षक जुंपले आधार लिंकच्या कामात

शिक्षक जुंपले आधार लिंकच्या कामात

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220919-WA0000.jpg

शिक्षक जुंपले आधार लिंकच्या कामात

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

परभणी:-जिंतूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मतदार कार्ड आधार शी लिंक करणे सुरु असल्याने शिक्षकाला बीएलओ म्हणुण नियुक्ती दिल्यामुळे शाळा सोडुन शिक्षक मतदाराच्या दारी फीरत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
निवडणूक म्हटले की शिक्षकाच्या मागे कामे लागणार निवडणुक जाहीर होण्यापुर्वी मतदारांची नावे यादीत समाविष्ठ करणे, यादीतुन नावे वगळणे, मृत्यु पावलेल्या मतदाराची नावे कमी करणे, नावे दुरुस्ती करणे, यासाठी बीएलओ म्हणुन का शिक्षकाची नियुक्ती केली जाते. असा प्रश्न पालकामधुन उपस्थित केला जात आहे. कोणतेही सर्वेक्षणाचे काम शिक्षकाला दिली जातात त्यामुळे शिक्षक मानसिक दृष्ट्या अतीरीक्त कामामुळे शिक्षकाचे शाळेतील लक्ष कमी होवून
शिक्षक जुंपले आधार लिंकच्या कामात विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत आहे. शिक्षकांवर
शासनाच्या वतीने मतदार
नोंदणी, इतरही काही सर्वेक्षणाची कामे लावली जात असतात. त्याच प्रमाणे सध्या शिक्षकांना मतदार कार्ड आधारकार्डशी लिंक करण्यासाठी घरोघरी फिरावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहत आहेत. आणि शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये एकप्रकारे अंतर पडत असल्याने तेवढ्या काळात विद्यार्थी शिक्षक वर्गात नसल्यामुळे अभ्यास करत असेल का असा प्रश्न पडतो. शिक्षकानी शिक्षकाचे कार्य करावे की इतर कामे करावे असा प्रश्न पडला आहे. प्रशासनाने शिक्षकावरील इतर कामाची जबाबदारी काढुन इतराना द्यावी अशी मागनी पालक वर्गातुन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here