Home परभणी येलदरी पाणी कोणत्याही क्षणी सोडणार

येलदरी पाणी कोणत्याही क्षणी सोडणार

55
0

आशाताई बच्छाव

IMG-20220907-WA0001.jpg

येलदरी पाणी कोणत्याही क्षणी सोडणार

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

(परभणी) जिंतूर:- पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी व सिध्देश्‍वर जलाशयातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे पाटबंधारे खात्याद्वारे पूर्णा नदीच्या पात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. तसेच येलदरीच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळेच येलदरी व तेथून सिध्देश्‍वर जलाशयात पाण्याची आवक होत आहे. एकूण पाणीसाठा व संभाव्य पाण्याची आवक ओळखून जलाशयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पाटबंधारे खात्याने येलदरी व सिध्देश्‍वर जलाशयातून दरवाजे उचलून कोणत्याही क्षणी पूर्णा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पाटबंधारे खात्याच्या या संभाव्य कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हा प्रशासनाने पूर्णा नदी काठच्या गावच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा बजावला आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये, वाहने, जनावरे सोडू नयेत, कोणतीही जिवीत व वित्त हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, येलदरी जलाशयात मंगळवारी सायंकाळपर्यंत 461.580 मीटर पाणी पातळी तर 914.647 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. एकुण पाण्याची टक्केवारी 97.56 टक्के एवढी आहे. तर सिध्देश्‍वर जलाशयात 413 मीटर पाणी पातळी, 250.712 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध असून त्या पाणीसाठ्याची टक्केवारी 99.83 टक्के एवढी आहे.

Previous articleशेतकऱ्यांनी पशुधनांची काळजी घ्यावी लम्पी त्वचा रोग आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुपालकाना आवाहन
Next articleअनसिंग येथे राज साहेब हिंदू आखाड्याचे उद्घाटन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here