Home पुणे हैदराबाद मुक्तीसंग्रामावर आधारीत सात प्रस्ताव धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना सादर  

हैदराबाद मुक्तीसंग्रामावर आधारीत सात प्रस्ताव धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना सादर  

82
0

आशाताई बच्छाव

IMG-20230509-WA0015.jpg

हैदराबाद मुक्तीसंग्रामावर आधारीत सात प्रस्ताव धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना सादर

मराठवाडा जनविकास संघ व मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समितीचा पुढाकार 

पुणे, ब्युरो चीफ : उमेश. पाटील
मराठवाडा मुक्तीसंग्राम व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा जनविकास संघ व मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समिती धाराशिव यांच्या संयुक्तपणे देशप्रेम व हैदराबाद मुक्तीसंग्रामावर आधारीत सात प्रस्ताव धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ.  सचिन ओम्बासे यांना सादर करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम राष्ट्रभक्ती संस्करण महोत्सव तुळजापूर येथे आयोजित करणे, हैदराबाद मुक्तिसंग्राम आझाद मुक्तापूर स्वराज्य महोत्सव जामगाव (ता. माढा) येथे आयोजन करणे, हुतात्मा श्रीधरवर्धक जन्मशताब्दी वर्षानिमित्त अमृतायण मराठवाडा मुक्तीसंग्राम वड महावृक्ष संवर्धन अभियान राबविणे, धाराशिव येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम प्रेरणास्थळ निर्माण संकल्प करणे, हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे आद्यपीठ राष्ट्रीय शाळा हिप्परगा येथे मराठवाडा प्रजा शिक्षण परिषद अधिवेशन आयोजन करणे, हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील पती-पत्नी गोदावरीबाई टेके व हुतात्मा किसनराव टेके बलिदान दिन इट (ता भूम) येथे साजरा करणे, पहिले हुतात्मा वेदप्रकाश यांचा बलिदान दिन गुंजोटी (ता. उमरगा) येथे साजरा करणे यांचा समावेश आहे. पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रेचे संकल्पक अभियंता नितीन चिलवंत यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम वर्षासाठी ७ प्रस्ताव तयार केले असून, ते जिल्हाधीकाऱ्यांसमोर मांडण्यात आले.
मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी सांगितले, की मराठवाड्याच्या विकासासाठी सर्वोतोपरी काम करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. धाराशिव मध्ये चालवत असलेली स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक शाळा व धाराशिव प्रशालेच्या जागेच्या प्रश्नांसंदर्भात शासनस्तरावर मदत करण्याचे आश्वासन दिले. मुरलीधर होनाळकर यांनी धाराशिव जिल्हयाचे सर्व प्रस्ताव शासन स्तरावर पाठपुरावा करणार असे सांगितले. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात फेसबुक लाईव्हमधून संवाद साधण्यात आला. यामध्ये जगभरातील ज्या ज्या देशात मराठवाडा भूमिपुत्र वास्तव्यास आहेत, त्यांनी १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव तिरंगा झेंडा फडकावून साजरा करणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व मराठवाडा संमेलनाचे आयोजन करणे असे दोन संकल्प करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले, की धाराशिव जिल्ह्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावावर समिती नेमून प्रत्येक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. मराठवाड्याच्या भूमिपुत्रांनी पुणे मुंबईस वास्तव्यास राहूनही आपल्या मातीसाठी लढा सुरू ठेवला आहे, त्यांचा अभिमान वाटतो.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक बुबासाहेब जाधव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मोहन पनुरे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, मुरलीधर होनाळकर, नितीन चिलवंत, सोमनाथ शेटे, वृक्षमित्र सोमनाथ कोरे, जयसिंग कदम, मोहन सुरवसे, सुरेश सोनवने, राहुल जगताप, धाराशिव प्रशालेचे संस्थापक आण्णासाहेब जाधव, लोकनियुक्त आदर्श सरपंच बालाजी पवार, रामेश्वर चव्हाण, महेश गुरव. अंकुश गायकवाड, विशाल पवार, पंडीत जाधव, बालाजी जाधव, श्रीकांत काटे, बालाजी गुरव, रमण जाधव, श्रीराम कदम, मोहन सुरवसे, अरूण माढेकर, धर्मवीर जाधव, अमोल लोंढे, प्रा. रत्नाकर खांडेकर, गोरख भोरे, बालाजी पांचाळ, गोकुळ खडके, तसेच स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक प्रशाला धाराशिवचे शिक्षकवृंद उपस्थित होते.

Previous articleश्रीक्षेत्र साळसाणे येथे शिव गोरक्षनाथ प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त—
Next articleनांदेड जिल्हा महसुल सहकारी पतसंस्थेत तलाठी तोतरे शिवाजी यांचे दणदणीत विजय
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here