Home नांदेड आषाढी एकादशी व बकरी ईद परस्पर स्नेहाने जपत साजरी करू – जिल्हाधिकारी...

आषाढी एकादशी व बकरी ईद परस्पर स्नेहाने जपत साजरी करू – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20220705-WA0027.jpg

आषाढी एकादशी व बकरी ईद परस्पर स्नेहाने जपत साजरी करू
– जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

▪️शांतता समितीच्या बैठकीत सर्व धर्मीयांचा निर्धार
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड  :- येत्या 10 जुलै रोजी घराघरात श्रद्धेने जपली जाणारी आषाढी एकादशी व मुस्लीम धर्मात कर्तव्य म्हणून साजरी होणारी बकरी ईद लक्षात घेता एकमेकांच्या श्रद्धेचा आदर बाळगून नांदेड जिल्ह्यात दोन्ही सण शांततेत साजरा करण्याचा निर्धार आज सर्व धर्माच्या प्रमुखांकडून घेण्यात आला. नांदेड जिल्ह्यात परस्पर स्नेह व शांतता याला नांदेड जिल्हावासियांनी आजवर प्राधान्य दिले आहे. एखादा अनुचित प्रकार गैरसमजातून झाल्याचे तर काही ठराविक एक, दोघांकडून झालेल्या चुकीमुळे आढळून आले. हा जिल्हा शांतताप्रिय असून याला कोणत्याही परिस्थितीत गालबोट न लागू देता सामाजिक शांततेवर अधिक भर देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अतुल कानडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर, शांतता समितीचे सन्माननिय सदस्य, हॅपी क्लबचे पदाधिकारी, धर्मगुरू आदी उपस्थित होते.

विविध धार्मिक सण, उत्सव साजरे करतांना कायद्याने आखून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. उत्साहाच्या भरात कायद्याचे कोणाकडून उल्लंघन होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. जिथे कुठे कोणी कायद्याचे पालन करणार नसेल तर तात्काळ संबंधिता विरुद्ध पोलीस विभागातर्फे कारवाई केली जाईल. सण, उत्सव हे आनंदासाठी असतात. आपण सर्वधर्मीय एकमेंकांच्या आनंदासाठी कटिबद्ध होऊन कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले. यावेळी श्रीमती साखरकर, मौलाना अय्युब कासमी, भदन्त पय्या बोधी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous articleसोयाबीन बियाणे पेरले पण उगवलेच नाही ; शेतक-यांना आर्थिक फटका
Next articleडाॅक्टर दिनाच्या निमित्ताने देगलूर उपजिल्हा रुग्णालय येथे शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांच्या वतीने डॉक्टरांचा सत्कार.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here