• Home
  • अल्पवयीन मुलीला पळवणाऱ्या तरुणाला नांदेड मध्ये अटक – सेल्फी फोटो वरून माटुंगा पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल

अल्पवयीन मुलीला पळवणाऱ्या तरुणाला नांदेड मध्ये अटक – सेल्फी फोटो वरून माटुंगा पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल

अल्पवयीन मुलीला पळवणाऱ्या तरुणाला नांदेड मध्ये अटक –
सेल्फी फोटो वरून माटुंगा पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल

नांदेड, दि.३१ – राजेश एन भांगे

गुन्हा कोणाताही असो, आरोपी स्वत:ला कितीही शातीर समजो मात्र पोलिसांच्या तावडीतून सुटलेला नाही, याचा प्रयत्य मुंबई पोलीस दलाच्या माटुंगा पोलिसांनी केलेल्या कारवाई वरून पुन्हा एकदा आला. १७ वर्षीय महाविद्यालयीन मुलीला पळवणाºया तरुणाला नांदेड जिल्ह्यात अटक करण्यात आली. पीडित मुलीच्या सेल्फी फोटो वरून माटुंगा पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर परिसरात राहणारी १७ वर्षीय मुलगी माटुंगा येथील व्ही_जी_टी_आय कॉलेजमध्ये शिक्षण घेते. ११ मार्च २०२० रोजी विद्यार्थीने नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली. मात्र संध्याकाळी पुन्हा घरी आली नाही. तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती कोठेच भेटली नाही. अखेर या प्रकरणी मुलीच्या भावाने माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार केली. आदित्य नलावडे (२०, रा. भिवंडी, ठाणे) याने बहिणीला पळवल्याचे तक्रारीत नमूद केले. त्यानुसार पोलिसांनी आदित्य विरुद्ध (गु. र. क्र. ८०/२०२०) भादंवि कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना दरम्यानच्या काळात कोरोनाचे (कोविड-१९) संकट आले. परिणामी काही काळ या गुन्ह्याच्या तपासत खंड पडला. मात्र अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू होताच माटुंगा पोलीस ठाण्याचे सायबर गुन्हे प्रकटीकरण पथक मुलीचा शोध घेऊ लागले.
पोलिसांपासून वाचण्यासाठी मुलीला पळवणाºया आदित्यने स्वत:चा व मुलीचाही मोबाईल फोन बंद ठेवला होता. त्यामुळे तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. मात्र पोलिसांनी तपास सुरूच ठेवला. दरम्यानच्या काळात मुलीने सेल्फी काढलेला फोटो सोशल मीडियावर वायर केला अन् तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना आदित्य व मुलीची माहिती समजली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक २७ आॅक्टोबर रोजी नांदेड येथे दाखल झाले व २८ आॅक्टोबर रोजी नांदेड जिल्ह्यात दाखल झालेल्या माटुंगा पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आदित्य नलावडे व मुलीला ताब्यात घेतले. त्यांना २९ आॅक्टोबर रोजी त्यांना मुंबईत आणले. तर मुलीची रवानगी बालगृहता करण्यात आली असून आदित्य नलावडे याला न्यायालयात हजर केले असता ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर गुन्ह्याचा उलघडा सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नागरे-पाटील, मध्य प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, परिमंडळ ४ चे उपायुक्त विजय पाटील, माटुंगा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त इंदलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज गावारे, पोलीस शिपाई (बक्कल नं. ०६११३६) संतोष पवार, पोलीस शिपाई (बक्कल नं. ०९३५७६) राहुल चतुर, महिला पोलीस शिपाई (बक्कल नं. ०९२७५७) सुनीता कांबळे आदी पथकाने केला.

anews Banner

Leave A Comment