Home रत्नागिरी मुसळधार पावसातही रत्नागिरीत एकता तिरंगा रॅलीला उत्तम प्रतिसाद

मुसळधार पावसातही रत्नागिरीत एकता तिरंगा रॅलीला उत्तम प्रतिसाद

26
0

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0048.jpg

मुसळधार पावसातही रत्नागिरीत एकता तिरंगा रॅलीला उत्तम प्रतिसाद                                                   रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा मोहिमेला शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील 100 फूटी स्तंभावरील ध्वजारोहणाने सुरुवात झाली. मुसळधार पाऊसधारांमध्ये भिजत हजारो रत्नागिरीकरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली व राष्ट्रभक्तीची ओळख करुन दिली. यानंतर आयोजित एकता तिरंगा रॅलीला देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला.

शनिवारी सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांच्या हस्ते हे ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इन्दूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आदिं प्रमुख उपस्थिती होती. तसेच अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, प्रांताधिकारी रत्नागिरी विकास सुर्यवंशी, रत्नागिरी तहसिलदार शशिकांत जाधव आदिंची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या ठिकाणी विविध शाळांचे व महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नागरिक उपस्थित होते. यामुळे प्रांगण फूलुन गेले होते. भव्य असा राष्ट्रध्वज वर जाताना सारे जण स्वातंत्र्याचा जयघोष करीत होते. यावेळी सर्वांनी आपापल्या हातातही तिरंगा सन्मानाने उंच धरला होता. त्याच सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली मात्र उपस्थितांचा उत्साह कमी झाला नाही. एक बाजूला आकाशातील पाऊस आणि त्याखाली तिरंग्याला वंदन करीत राष्ट्रभक्तीचा पाऊस असे चित्र या ठिकाणी दिसून आले.

पोलीस दलाने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली व पोलीस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीत सादर केले. भर पावसात चिंब भिजत महाविद्यालयीन युवतींनी जयगान यावेळी सादर केले. क्रिडाधिकारी कार्यालयातील स्पर्धेच्या विजेत्यांना यावेळी पुरस्कार देण्यात आले.

तिरंगा रॅलीला उदंड प्रतिसाद
यावेळी दुचाकी, चारचाकी व रिक्षा यांची एकता तिरंगा रॅली निघाली याला जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी हिरवा झेंडा दाखविला व ते स्वत: या रॅलीत सामिल झाले. त्यांचे दुचाकीवरील सारथ्य पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी केले. या रॅलीचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस दर, हेल्पिंग हॅन्डस, रत्नागिरी पत्रकार परिषद, व्यापारी संघटना, श्री रत्नागिरीचा राजा मित्रमंडळ यांनी संयुक्तपणे केले. या भव्य रॅलीत मराठा महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, लायन्स क्लब, शिव रुद्रा ढोल ताशा पथक, रोटरी क्लब, वैश्य युवा, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती रत्नागिरी शाखा, रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटना, शिवसेना प्रणित रिक्षा सेना, त्रिमूर्ती क्रिएशन, सुवर्णकार संघटना, संस्कार भारती, मोटर्स असोसिएशन, संस्कार भारती, कोस्टगार्ड, माजी सैनिक, महसूल, एसटी, आरटीओ, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, नगर परिषद, आदर्श विद्यार्थी वाहतूक संघटना, केमिस्ट असोसिएशन, भारतीय जैन संघटना उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होते. रॅलीत रत्नागिरी ऑटोमोबाईल संघटना, कृषी विभाग, नगरपालिका यांचे चित्ररथ देखील होते.

Previous articleचांदवडच्या कळमदरेत ग्रामसभा उत्साहात संपन्न
Next articleस्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत चिरायू हॉस्पिटलमध्येही शानदार ध्वजारोहण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here