• Home
  • येत्या दोन महिन्यांत १७ हजार रिक्त पदे भरणार

येत्या दोन महिन्यांत १७ हजार रिक्त पदे भरणार

  • ⭕ येत्या दोन महिन्यांत १७ हजार रिक्त पदे भरणार
    आरोग्य मंत्री- राजेश टोपे,⭕
    ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई : आरोग्य विभागातील डॉक्टर्स, विशेषज्ञ,नर्स,कर्मचारी यांची १७ हजार रिक्त पदे येत्या दोन महिन्याच्या आत भरण्यात येतील.त्यासाठी विभागाची सविस्तर बैठक घेण्यात आली असून, लॉकडाऊनच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक असणाऱ्या मुलाखती देखील घेतल्या जातील आणि ही पदे भरले जातील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

  • फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी आज जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.आरोग्य विभागातील डॉक्टर्स, विशेषज्ञ, नर्स, कर्मचारी यांची १७ हजार रिक्त पदे येत्या दोन महिन्याच्या आत भरण्यात येतील.
    त्यासाठी काल विभागाची सविस्तर बैठक घेतली आहे. लॉकडाऊनच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक असणाऱ्या मुलाखती देखील घेतल्या जातील आणि ही पदे भरले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात आज कोरोनाचे १२०२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची ही सर्वाधीक संख्या असून राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे २५ टक्के आहे. कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर नेण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नॉन रेड झोन मध्ये बऱ्यापैकी शिथीलता देण्यात आली असून खासगी डॉक्टर्स आणि शासन यांच्यात समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
anews Banner

Leave A Comment