- ⭕ करोना संकट हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी
( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )मुंबई : कोरोनाचे संकट हाताळण्यात राज्यातील ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र होरपळला जात आहे.राज्य सरकारचा प्रत्येक बा बतीतला नाकर्तेपणा निदर्शनास आणून देण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेवून निवेदन दिले.
या शिष्टमंडळात माजी मंत्री विनोद तावडे, आशीष शेलार, खा. गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, आ. अतुल भातखळकर यांचा समावेश होता. या निवेदनानंतर माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोरोनामुळे जे संकट उभे ठाकले आहे,त्याचा सामना करण्यासाठी जी प्रभावी पाऊले टाकण्याची गरज होती, ती टाकलेली दिसत नाही.
