Home सोलापूर टेंभुर्णी ते कुसळंब या ७३ किलोमीटर लांबीच्या तीन पदरी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन...

टेंभुर्णी ते कुसळंब या ७३ किलोमीटर लांबीच्या तीन पदरी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आ. राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

110
0

आशाताई बच्छाव

IMG-20220907-WA0035.jpg

टेंभुर्णी ते कुसळंब या ७३ किलोमीटर लांबीच्या तीन पदरी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आ. राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनल महादेव घोलप.चीफ biro सोलापूर जिल्हा.

पूर्वीच्या दोन पदरी रस्त्याचे रूपांतर करून नव्याने तीन पदरी रस्त्या होणार असून, ८४ कोटी रुपये खर्चून सदरचे ७३ किलोमीटरचे काम पूर्ण होणार आहे. औरंगाबादच्या संत सतरामदास इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने या कामाचे टेंडर घेतलेले असून, दोन वर्षात हे काम पूर्ण होईल .

मागील दोन ते चार वर्षापासून सदरचे काम रखडले होते, हे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी मी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. नितीनजी गडकरी साहेब यांची भेट घेऊन पत्रव्यवहार केला होता. यावेळी मा. नितीनजी गडकरी साहेबांनी लवकरच या कामास सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.

बार्शी तालुक्याला जोडण्यात येणाऱ्या इतर तालुके व जिल्ह्याचे दळणवळणाच्या रस्त्याचे जाळे, त्याचप्रमाणे बार्शी तालुक्यातील गावांना एकमेकांशी जोडणारे रस्ते करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी मी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सतत संपर्कात राहून प्रयत्नशील आहे. मागील अडीच वर्षांच्या आमदारकीच्या काळात बार्शी शहर व तालुक्यातील रस्त्यांकरीता केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून शेकडो कोटींचा निधी उपलब्ध करून घेतला असून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत व अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत.

यावेळी माजी नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती अनिल काका डिसले, जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे, प्रशांत कथले, विलास आप्पा रेणके, सुभाष शेठ लोढा, विजय नाना राऊत, प्रोजेक्ट मॅनेजर एस.पी. शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleनांदगांव शहरात तीन दुकानें फोडली,।         
Next articleसंग्रामपूर तालुक्यात जनावरांना लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव आरोग्य यंत्रणा सज्ज,!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here