Home बुलढाणा संग्रामपूर तालुक्यात जनावरांना लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव आरोग्य यंत्रणा सज्ज,!

संग्रामपूर तालुक्यात जनावरांना लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव आरोग्य यंत्रणा सज्ज,!

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20220907-WA0022.jpg

संग्रामपूर तालुक्यात जनावरांना लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव आरोग्य यंत्रणा सज्ज,!

शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेण्याची गरज !!, माणसांना धोका नाही

युवा मराठा नुज वेब पोर्टल
प्रतिनिधी रविंद्र शिरस्कार
संग्रामपूर

संग्रामपूर तालुक्यात पाळीव जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावआढळून आला असून . माणसांना या आजाराचा धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे, पशुपालकांनी आपापल्या जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन तालुका पशू वैद्यकीय अधिकारी डॉ,जगताप यांनी केले,राजस्थान, गुजरातमध्ये आढळणारा
लम्पी सदृश आजार आपल्याकडेही फैलावत आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये
सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.उष्ण व दमट वातावरणाने याचा
प्रादुर्भाव होतो या आजारापासून जनावरांचे संरक्षण कसे व्हावे, यासाठी त्वरित पशुवैद्यकाकडून तालुक्यात वरव ट बकाल, वान खेड, इतर ठिकाणी उपचार पद्धती सुरु केली असून पशू वैद्यकीय यंत्रण सज्ज झली असून तालुक्यात कामाला वेग आला आहे, हा रोग पोक्सविरिडी या
विषाणूच्या जातीमधील कप्रीपोक्स या विषाणूमुळे गाय, म्हैस, बैल, वासरे यांना होतो. हा संसर्गजन्य रोग असून एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना
चावणाऱ्या डास, गोचीड, गोमाश्या यांच्याद्वारे तसेच आजारी जनावरांच्या
खाद्य, पाणी, भांडे यांच्या संपर्कामुळे होतो. या रोगात मृत्यूदर कमी असला
तरी रोगग्रस्त जनावरे अशक्त होतात.रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन
दूध उत्पादनही कमी होते. त्यांची कामे करण्याची कार्यक्षमता कमी होते. काही वेळा गर्भपात होऊन प्रजनन क्षमता घटते. या रोगात त्वचा खराब होऊन जनावरे विकृत दिसतात.यामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी संसर्गजन्य रोग असल्यामुळे आजारी जनावरे कळपातून वेगळी करावी.आजारी जनावरांना नागरिकांनी कॉरंटाईन ठेवावे. त्यांचे चारा, पाणी वेगळे करावे.बाह्य परजीवांचा डास, गोचीड,गोमाशा, माशा याचा बंदोबस्त करावा असे आवाहन तालुका पशू वैद्यकीय अधिकारी डॉ जगताप यांनी संग्रामपूर पातुर्डा, वानखेड, येथील ग्रामपंचायत मार्फत शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करून मीडिया समोर आवाहन केले आले आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here