आशाताई बच्छाव
मनसेचे सचिन पाटील यांचा खून
शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)
परभणी:- शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन पाटील यांचा मध्यरात्रीनंतर धारदार शस्त्राने गळ्यावर वार केल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना घडली. पाटील यांच्या गळ्यावर वार केल्यानंतर ते जागेवरच कोसळले व काही वेळा त्यांचा प्राण गेला. रात्री उशिरापर्यंत ते आपल्या राहत्या घराजवळच शिवराम नगर येथे मित्रांसोबत होते सोबत असलेल्या विजय जाधव यांच्या सोबत वाद झाल्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले त्यामध्ये जाधव यांनी किचन मधील चाकू ने पाटील यांच्यावर वार केले त्यांनतर जखमी सचिन पाटील यांना रुग्णालयात घेवून गेल्यावर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. अधिक तपास चालू आहे.