आशाताई बच्छाव
माता-भगिनींच कुंकू पुसणाऱ्यांचा हिशेब चुकता – डुंगरवाल
श्रीरामपूर (प्रतिनिधी दिपक कदम) –जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये आपल्या माता-भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तान दहशतवाद्यांचा बदला भारतीय सैन्याने मिशन सिंदूर राबवून अखेर घेतला. भारतीय सैन्याने – पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला आणि – ते उद्ध्वस्त केले. भारतीय न सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील – दहशतवादी तळांवर अचूक हल्ला केला. लष्कराच्या या हवाई – हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर हे योग्य नाव देऊन माता-भगिनींच – कुंकू पुसणाऱ्यांचा हिशेब चुकता केल्याचे मत तिलक डुंगरवाल यांनी व्यक्त केले.भारताच्या तिन्ही सैन्य दलाच्या जवानांनी ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते करून पाकिस्तानातील अतिरेक्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. या
घटनेचा श्रीरामपुरात समर्थ ग्रुपच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.विकास डेंगळे म्हणाले की, आज पर्यंतच्या काळामध्ये भारतावर दहशतवाद्यांनी हल्ले केले. त्यांना अशा प्रकारचं उत्तर देण्यात आलं नव्हतं. पहिल्यांदा दहशतवाद्यांना त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून योग्य प्रत्युत्तर देण्यात आलं, या कारवाईची गरज होती असे ते म्हणाले.याप्रसंगी समर्थ ग्रुपचे राहुल रणपिसे, भैरवशेठ मोरे, भरत डेंगळे, अरविंद पटेल, प्रवीण काळे, प्रदीप उंडे, प्रसाद कटके, युवराज घोरपडे, राहुल लुक्कड, सलीम शेख, मनोज बोंबले, महेबूब शेख, मुबारक शेख, भागवत बोंबले, महेश कौटाळे, मोहन तेलोरे, किरण गायकवाड, मनोज गायकवाड, शेखर उंडे, दीपक बोर्डे, विकास बोर्ड, शिवा गोरे, अभिजीत राऊत, अमोल भडांगे, नितीन मोरे, देवराज मुळे, महेश रासकर, सुरेश फोपसे आदी उपस्थित होते.






