Home बुलढाणा सासरच्या त्रासाला कंटाळून २५ वर्षीय महिलेचा राहत्या घरात गळफास

सासरच्या त्रासाला कंटाळून २५ वर्षीय महिलेचा राहत्या घरात गळफास

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20220911-WA0020.jpg

सासरच्या त्रासाला कंटाळून २५ वर्षीय महिलेचा राहत्या घरात गळफास

पती,सासु,सासरा,दिर यांच्यावर झाला गुन्हा

युवा मराठा वेब न्यूज पोर्टल प्रतिनिधी-रविंद्र शिरस्कार ,संग्रामपूर

संग्रामपुर तालुक्यातील ग्राम. वरवट ( बकाल) येथील २५ वर्षीय विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार सदर विवाहितेला हुंडा कमी दिल्याने तसेच तिला शारीरिक, मानसिक त्रास दिल्याने दिल्याने तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला असुन या प्रकरणात सदर महिलेचा पती, सासू, सासरे,देर या चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविलेला आहे आला आहे. त्यामध्ये सद्या मृतक महिलेच्या पतीस अटक करण्यात आली असून सासू,सासरा,आणि देर फरार आहेत

मृतक महिलेचा भाऊ फिर्यादी राजेश प्रल्हाद धुळे रा.हिवरखेड ता.तेल्हारा यांनी ८ सप्टेंबर २०२२ रोजी तामगांव पो. स्टे.ला
लेखी तक्रार दिली आहे की माझी बहीण नामे सौ. मीना मंगेश टाकळकर वय २५ वर्षे हिला आरोपी नेहमी लग्नात हुंडा कमी दिला आहे असे म्हणून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत असत. या त्रासाला कंटाळुन माझ्या बहिणीने आरोपी यांच्या राहत्या घरात आत्महत्या करून
मरण पावली आहे.
यावरून अप.क्रमांक २६१ /२०२२ कलम ४९८ भादवी ३०६ नुसार पती मंगेश किसनराव टाकळकर, सासरे किसनराव टाकळकर, सासु सरुबाई किसनराव टाकळकर व दिर संदीप किसनराव टाकळकर रा वरवट बकाल ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी मृतकाचे पती मंगेश टाकळकर यास अटक करण्यात आली असून सासू, सासरा व दिर फरार असल्याचे समजते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत विखे हे करीत आहेत. मृतक विवाहितेस दिड वर्षाचा १ मुलगा आहे. आई विना लहान बाळ पोरके झाले असल्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त आहे.

Previous articleमनसेचे सचिन पाटील यांचा खून
Next articleपायरपाडा येथील महिला पुरात गेली वाहून
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here