Home नांदेड कौश्यल्याधिष्टीत शिक्षणाच्या आधारेच विकसित भारताचे ध्येय साकार होणार – डॉ. शैलेंद्र देवळाणकर

कौश्यल्याधिष्टीत शिक्षणाच्या आधारेच विकसित भारताचे ध्येय साकार होणार – डॉ. शैलेंद्र देवळाणकर

27
0

आशाताई बच्छाव

IMG_20240120_075320.jpg

कौश्यल्याधिष्टीत शिक्षणाच्या आधारेच विकसित भारताचे ध्येय साकार होणार – डॉ. शैलेंद्र देवळाणकर

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर: प्राचीन वैभवशाली परंपरा लाभलेल्या भारत देशाची वाटचाल विकसित भारत बनविण्याकडे असून केंद्रशासनाने पुढील २५ वर्षासाठी दीर्घकालीन नियोजन तयार केले आहे. भारत देशाला विकसनशील राष्ट्रातून विकसित राष्ट्राकडे जाण्यासाठी पुढील २५ वर्षाचा कालखंड हा संक्रमणाचा असणार आहे. विकसित भारत निर्माण करण्यासाठी साधन संपत्तीचा विकास ,आरोग्यविषयक जागरूकता, मेक इन इंडियाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुण देणे आवश्यक आहे. मनुष्यबळाचा विकास करण्यात शिक्षण हेच एकमेव महत्वपूर्ण माध्यम असून दर्जेदार शिक्षण देवून कौशल्यावर आधारित मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची अमलबजावणी जून २०२४ पासून सर्वत्र केली जाणार आहे. या शैक्षणीक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणले जाणार आहेत. यातून विद्यार्थ्याच्या जीवनाला दिशा मिळणार आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्ययाचे उच्च शिक्षण विभागगाचे संचालक डॉ.शैलेंद्र देवळणकर यांनी केले.ते येथील अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोक प्रशासन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ४०व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करीत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पा.बेंबरेकर होते तर व्यासपीठावर उच्च शिक्षण सहसंचालक ,नांदेड डॉ.किरणकुमार बोंदर, महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय वाघ व सचिव डॉ. संभाजी पाटील, संमेलनाध्यक्ष आदर्शमहाविद्यालय ,हिंगोलीचे प्राचार्य डॉ.विलास आघाव अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे सचिव शशिकांत चिद्रावार, उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, सहसचिव सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, , जनार्दन चिद्रावार रवींद्र अप्पा द्याडे. देवेंन्द्र मोतेवार , चंद्रकांत नारलावार, विचारमंथन संशोधन पत्रिकेचे संपादक डॉ प्रमोद पवार, डॉ. मनोहर पाटील, डॉ. पी.डी.देवरे व परिषदेचे उपाध्यक्ष यांची विशेष उपस्थिती होती. प्रारंभी दिप प्रज्वलन व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत गीत प्रा. गौतम भालेकर व प्रकाश सोनकांबळे यांनी सादर केले .
प्रारंभी प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांनी स्वागतपर विचार मांडताना अडत व्यापारी शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून ते वर्तमान काळात महाविद्यालयाच्या विविध क्षेत्रातील विकासाचा आलेख प्रतिपादन केले . आज जग झपाट्याने बदलत असुन स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी इयत्ता अकरावीच्या वर्गापासून विशेष वर्ग चालवीत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. आमच्या महाविद्यालयात या दोन दिवसीय अधिवेशनात केल्या जाणा-या चर्चेचा पदव्युत्तर व पीएच. डी. संशोधक विद्यार्थ्याला निश्चित उपयोग होईल असे प्रतिपादन केले .
यावेळी विचारमंथन संशोधन पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले, डॉ लक्ष्मण ऊलगडे लिखित नेट- सेट पेपर क्र दोन राज्यशास्त्र व लोकप्रशासन या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गुरुराज शशिकांत चिद्रावार यांची नांदेड विद्यापीठाच्या मा. कुलगुरूनी मॉडर्न डिग्री कॉलेज च्या अभ्यास मंडळात सदस्यपदी नामनिर्देशन झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. डॉ. संजय वाघ यांनी प्रास्ताविकातून अधिवेशन आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेश्वर दुडुकनाळे तर आभार डॉ. माधव चोले यांनी मानले दोन दिवस चालणाऱ्या अधिवेशनात “लोकशाहीतील संक्रमणे” या विषयावर २०५ प्राध्यापक व संशोधक आपले शोधनिबंध सादर करणार आहेत. महाराष्ट्र व देशभरातील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयाच्या प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ऊपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उपप्राचार्य प्रा. ऊतमकुमार कांबळे , पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी यांच्यासह विविध राज्यातील प्राध्यापक, पीएच.डी.संशोधक , कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here