Home जळगाव धरणगाव येथे भाजपचा”सेवा पंधरवाडा” अभियानाचा खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत समारोप

धरणगाव येथे भाजपचा”सेवा पंधरवाडा” अभियानाचा खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत समारोप

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20231003-WA0092.jpg

धरणगाव येथे भाजपचा”सेवा पंधरवाडा” अभियानाचा खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत समारोप
——————————-
धरणगाव प्रतिनिधी – देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्वात भारताने अंतराळात इतिहास रचला आहे. दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला असून भारत जगातील चौथी अंतराळ शक्ती उदयास आली आहे. भारतीयांसाठी ही सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट असून गौरवाची कामगिरी करणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने 17 सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या काळात सेवा पंधरवाड्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून जनकल्याणकारी योजनांच्या लाभासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहे. येत्या काळात देशातील गोरगरीब शोषित वंचित वर्गाच्या कल्याणा करता यापुढे देखील कार्यकर्त्यांचे परिश्रम सुरु राहतील अशी भावना खासदार उन्मेशदादा पाटील यांनी धरणगाव येथे सेवा पंधरवाड्याच्या समारोप प्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर तर माजी आमदार स्मिताताई वाघ,जेष्ठ नेते सुभाष आण्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार उन्मेषदादा पाटील यांनी मोटार सायकलवर घर-घर संपर्क अभियानानिमित्ताने जुन्या कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटीगाठी

धरणगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज स्वच्छ भारत अभियानानिमित्त जयश्री दादाजी मंदिर येथे स्वच्छता व वृक्षारोपण करण्यात आले. खासदार उन्मेशदादा पाटील यांनी मोटरसायकल फिरून जेष्ठ कार्यकर्ते,पूर्व पदाधिकारी यांच्या भेटी-गाठी घेतल्या त्यात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.व्ही.आर.तिवारी,माजी नगरसेवक पुंडलिक काका वऱ्हाडे,मा.शहराध्यक्ष आधार नाना चौधरी, एकनाथ काका महाजन,किशोरसिंह चव्हाण, मनीलाल महाजन,प्रल्हाद पाटील,रमेशआप्पा महाजन,मनोहर बडगुजर,आंनद वाजपेयी,अँड वसंतराव भोलाणे आदींच्या भेटी घेऊन सेवा पंधरवाडयातील कार्यक्रमाची माहिती देत मार्गदर्शन घेतले.
तर खासदार उन्मेशदादा पाटील व जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ,जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील,जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील,शिरीष आप्पा बयास,ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन,कमलेश तिवारी,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,पुनिलालअप्पा महाजन,दिनेश पाटील, रेल्वेचे झेड आर यू सी सी सदस्य प्रतीक जैन,संतोष चौधरी,राजेंद्र पाटील,शेखर पाटील,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निर्दोष पाटील,शहराध्यक्ष दिलीप महाजन,गटनेते कैलास माळी सर,नगरसेवक शरद अण्णा कंखरे,कडूअप्पा बयास,गुलाबराव मराठे,ललित येवले,भालचंद्र माळी,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष टोनी महाजन,चंदन पाटील,सरचिटणीस ऍड कन्हैया रायपूरकर, सुनील चौधरी, आनंद वाजपेयी, वासुदेव महाजन,सचिन पाटील,जुलाल भोई, महाराज,अनिल महाजन,पंडीत मराठे,राजेंद्र महाजन,युवा मोर्चाचे विशाल महाजन, विक्की महाजन,निलेश महाजन,हर्षल चव्हाण, जळगाव तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleपाथरवाला  गावातील प्रमुख रस्त्याच्या कामास सुरुवात
Next articleसरस्वती प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये म. गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here