Home Breaking News *संघर्षाच्या काटेरी वाटेवरील प्रवासी, राजेंद्र पाटील राऊत एक अवलिया*

*संघर्षाच्या काटेरी वाटेवरील प्रवासी, राजेंद्र पाटील राऊत एक अवलिया*

463
0

*संघर्षाच्या काटेरी वाटेवरील प्रवासी, राजेंद्र पाटील राऊत एक अवलिया* रावळगाव नाशिक( विष्णू अहिरे विभागीय संपादक युवा मराठा न्यूज़) १३ मे २०१३ हा दिवस मला आजही आठवतो कडक उन्हात जळगाव गाळणे रावळगाव रस्त्यावर त्यांची माझी भेट झाली! ऊन खुप असल्यामुळे ते झाडाचे सावलीत उभे होते .बाजुला सायकल लावलेली होती, मी सहजच चौकशी केली असता समजले की ते स्वतचे युवा मराठा वृत्तपत्र मालेगाव तालुक्यातील गावागावात सायकल ने जाऊन वाटत होते, त्या वरुन त्यांची परिस्थिती काय असेल याची जाणिव झाली. व हा माणुस नक्कीच पत्रकारिता क्षेत्रात पुढे जाईल याची खात्री मला तेव्हाच झाली होती. आणि आज खरच ते भाकित खरे ठरले! व आज त्यांनी या क्षेत्रात भरपुर यश प्राप्त केले म्हणून त्यांचा खडतर, कष्टमय जिवनपट वाचका समोर मांडावा असे मला वाटले म्हणून हे लिहीत आहे . पत्रकारिता क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्व राजेंद्र पाटील राऊत यांचा जीवन पट खुपच खडतर असा आहे राजेंद्र पाटील राऊत यांचा जन्म २०आँक्टोबर १९७१ रोजी श्रीरामपूर येथे झाला त्यांचे वडील शासकीय सेवेत नोकरीला होते राजेंद्र दिड वर्षाचा असताना त्यांचे वडीलांचे हार्टअँटकने निधन झाले.त्यानंतर आई लक्ष्मीबाई यानी मुलगा राजेंद्र व मुलगी याना नाशिक जिल्ह्यातील मालेगावजवळील कौळाणे (निं) या गावी आईच्या माहेरी व त्यांच्या आजोळी घेऊन आली.कौळाणे हे त्यांच्या मामांचे गाव.या गावात आयुष्य जगत असताना अनंत खस्ता राजेंद्र यानी खाल्ल्या व संघर्ष केला.लोकांच्या शेतात मोलमजुरीचे काम केलीत.लोकांच्या दारोदार पेपर वृतपत्र वाटप केलीत.शिक्षण कौळाणे व सोनज विद्यालयात पुर्ण केले.या संघर्षमय वाटचालीत लहानपणापासून त्यांची मेव्हणबहिण पुर्वाश्रमीची आशा शेवाळे व आताची श्रीमती आशाताई बच्छाव यांनी पाटील यांना नेहमीच प्रोत्साहन दिले.हिंमत दिली.म्हणूनच त्यानी सकाळ, लोकमत गावकरी रामभुमी सारख्या वृतपत्रात जिल्हास्तरावर कौळाणे वार्ताहर म्हणून कामे केलीत.त्यानंतर राज्यस्तरावरील साप्ताहिक श्री,पोलिस विश्व, खरा गुन्हेगार,पोलिस नजर, सत्यवार्ता, पोलिस वाणी,कोकण चौफेर आणि राष्ट्रीय पातळीवर अनुभवी आँखे न्युज चँनल व न्युजपेपर दिल्लीसाठी महाराष्ट्र प्रमुख म्हणून कामे केलीत त्यानंतर दिनांक २० आँक्टोबर २००३ रोजी स्वतःचे युवा मराठा हे साप्ताहिक वृतपत्र सुरु केले.मात्र नंतरच्या काळात धावपळीचे युग व आँनलाईनचा जमाना आल्याने वृतपत्रात थोडा बदल करुन युवा मराठा न्युज चँनल या नावाने आँनलाईन वृतवाहिनी सुरु केली,व वेब पोर्टलच्या माध्यमातून आधुनिक पध्दतीने बातम्या प्रसारीत करण्याचा बदल केला आज युवा मराठा न्युज पोर्टलचे महाराष्ट्रभरात एकूण ४३००० हजार वाचक तयार झालेत.तर युवा मराठा न्युज साठी आज महाराष्ट्र भरात एकूण ४८पत्रकार प्रतिनिधी मित्र जोडले गेले आहेत.हाच खरा तर संघर्षाच्या काटेरी वाटेवरील प्रवास आहे. २०१९ च्या जानेवारी महिन्यात मुंबईला क्राँईम इन्वीस्टिगेशन एक्सप्रेस या वृतपत्राचा समाजभुषण पुरस्कार सन्मानचिन्ह गौरवपत्र व शाल श्रीफळ देऊन सन्मानीत केले गेले.त्याशिवाय आज रोजी एडिटर्स अँन्ड जर्नालिस्ट वेल्फेयर असोशियन मुंबई या पत्रकारांच्या संघटनेवर महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.शिवाय पोलिस मित्र आणि इतरही सामाजिक संस्था संघटनावर कार्यरत आहे,त्याशिवाय ज्या गावात पत्रकारितेची सुरुवात केली त्या कौळाणे गावात ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ,लताबाई बच्छाव तत्कालीन ग्रामसेवक संजय घोंगडे व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत सत्कार सन्मान करण्यात आला,या सगळ्या प्रवासात बालपणाचा मित्र राजेंद्र शामराव वाघ राजेंद्र तुकाराम पवार हे नेहमीच पाठीशी उभे राहिलीत.तर श्रीमती आशाताई बच्छाव या एक खंबीर शक्तीनिशी सतत हिंमत देऊन धाडस दाखवित राहिल्यात.आणि हे करावेच लागेल असे प्रोत्साहन देत राहिल्या म्हणून हे शुन्यातून विश्व निर्माण करण्याचे धाडस त्यांच्यात आले हा रोमांचक जिवन काल नक्कीच इतरासाठी प्रेरणादायी ठरेल!!

Previous articleउमरी येथे महा.वि.अ.च्या विरोधात भाजपाच्या वतिने रास्तारोको महाएल्गार आंदोलन संपन्न –
Next articleनांदेड शहरातील गरीबांच्या घरांसाठी तब्बल ७० कोटींचा निधी ; अशोक चव्हाण –
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here