Home जालना ‘सर्वसामान्यासाठी अतिशय निराशाजनक पण निवडणूक 24 डोळ्यासमोर ठेवून ठोस तरतुदीशिवाय मोठ्या घोषणांचा...

‘सर्वसामान्यासाठी अतिशय निराशाजनक पण निवडणूक 24 डोळ्यासमोर ठेवून ठोस तरतुदीशिवाय मोठ्या घोषणांचा अंतरिम अर्थसंकल्प!’

23
0

आशाताई बच्छाव

IMG_20240202_092812.jpg

‘सर्वसामान्यासाठी अतिशय निराशाजनक पण निवडणूक 24 डोळ्यासमोर
ठेवून ठोस तरतुदीशिवाय मोठ्या घोषणांचा अंतरिम अर्थसंकल्प!’
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. संजय लाखेपाटील यांची प्रतिक्रिया
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ः काल संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना उद्देशून केलेल्या आपल्या अभिभाषणात देशाच्या राष्ट्रपतीं श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रातील मोदी सरकारचा विकासाचा दृष्टीकोन अधोरेखित करतांना ‘विकसित नव भारताची इमारत युवा, शेतकरी,महिला आणि गरीबी’ या चार स्तंभाच्या आशा-आकांक्षेवर ऊभी असेल असे वक्तव्य केले होते. त्यामुळे आज सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात या वर्गासाठी विशेष तरतुदी असतील असा जाणकारांचा होरा होता. परंतु दुर्दैवाने आज सादर केलेल्या ‘लेखानुदानात’ मात्र या वर्गासाठी कसल्याही भरीव तरतूदी न करता अर्थमंत्र्यांनी घोर निराशा केली आहे! देशाच्या सार्वत्रीक निवडणूका कधीही जाहीर होणार असल्यामुळे आज अर्थसंकल्पाऐवजी केवळ लेखानुदान सादर होणार असल्यामुळे जास्त अपेक्षा तर निश्चितच नव्हत्या पण अर्थमंत्री सुध्दा लेखानुदानाची बंधने पाळतील अशी साहजिकच अपेक्षा होती. पण ती अर्थमंत्री श्रीमंती निर्मला सिताराम यांनी पाळली नाही आणि ‘हातभर लाकूड दिड हात ढपली’ अशी वक्तव्ये करत राणा भीमदेवी सवंग घोषणा करत देशातील नागरिकांना ‘विकसित भारत 2045′ ची गाजरे मात्र दाखवली! देशात 360 कृषी विद्यापीठे,  डझनावारी एम्स संस्था हजारो आयटीआय स्थापन करण्याचे जाहीर करत पण न झेपणाऱ्या शिवधनुष्याला हात घातला!
अतिशय आश्चर्यकारक म्हणजे देशातील मध्यमवर्गीय, शेती  शेतकरी, महिला, विद्यार्थी, सिंचन, आरोग्य यावर भरीव तरतूद किंवा कसल्याही कर/आयकर सवलती न देणा-या, स्लॅब न बदलणा-या अर्थमंत्र्यांनी देशातील त्यांच्या आवडीच्या कार्पोरेट सेक्टरवर मात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here