Home पश्चिम महाराष्ट्र तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी पंधरा लाखाचा निधी – आ . संजयमामा शिंदे

तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी पंधरा लाखाचा निधी – आ . संजयमामा शिंदे

119
0

राजेंद्र पाटील राऊत

तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी पंधरा लाखाचा निधी – आ . संजयमामा शिंदे
सोलापूर,( महादेव घोलप प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
करमाळा 2020 ते 2025 या पंचवार्षिक निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात 51 ग्रामपंचायतीचा समावेश आहे . या ग्रामपंचायती पैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध कशा होतील याकडे गाव पुढाऱ्यांनी लक्ष द्यावे असे आवाहन करतानाच बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी आपण कमीत कमी 15 लाख रुपयांचा निधी आमदार फंडामधून देऊ अशी घोषणा आ . संजयमामा शिंदे यांनी केली आहे . याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की , पंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत हा पायाभूत घटक आहे . त्यामुळे ग्रामपंचायत हाच खऱ्या अर्थाने ग्रामविकासाचा पाय आहे . गटातटाचे राजकारण न करता गाव विकासासाठी गावातील मतदारांनी बिनदि पद्धतीने ग्रामपंचायत निवडली तर त्या गावाचा विकास निश्चितच होत असतो . करमाळा तालुक्यातील उमरड , शेटफळ , कुंबेज केडगाव , अर्जुननगर , मिरगव्हाण , पाडळी , पांडे , पोटेगाव , बाळेवाडी , घारगाव , फिसरे , करंजे , कोळगाव , दिलमेश्वर , कुंभेज , सरपडोह , गुळसडी , ढोकरी , जेऊरवाडी , कोंढेज , झरे , शेलगाव ( क ) , सौंदे , हिवरे , निमगाव , साडे , सालसे , आळसुंदे , नेरले , हिसरे , पांगरे , पाथर्डी , सांगवी , मलवडी , कविटगाव , हिवरवाडी , अळजापूर , देवीचामाळ , वडगाव , पुनवर , देवळाली , बोरगाव , बिटरगाव , पोथरे , भोसे , रोशेवाडी , जातेगाव , पिंपळवाडी , सावडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत . या ग्रामपंचायती पैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध कराव्यात असे आवाहन त्यांनी तालुकावासियांना केले आहे.

Previous articleसरपंच आरक्षण सोडतीला विरोध हायकोर्टात याचिका दाखल
Next articleऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी धरले तीनही कंपन्यांच्या प्रशासनाला धारेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणारआज  बैठक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here