Home माझं गाव माझं गा-हाणं दहिवड येथील भौरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार

दहिवड येथील भौरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार

636

राजेंद्र पाटील राऊत

दहिवड येथील भौरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार
(युवराज देवरे प्रतिनिधी)
रामनगर(दहिवड) २० मे
देवळा तालुक्यातील दहिवड रामनगर येथील भौरी शिवारात राहणाऱ्या विनोद प्रभाकर शिंदे यांच्या मालकीच्या गट नंबर 137 ब मध्ये बुधवार दिनांक 19 मे रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करीत शिंदे यांच्या मालकीच्या पाळीव गाईचा फडशा पाडला.
याबाबत त्यांनी दूरध्वनीवरून युवराज देवरे यांनी वनविभागाला याची माहिती दिली असता वनपाल अरुण मोरे, वनरक्षक एम एम साळुंके. यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसान भरपाई बाबत पंचनामा केला.
याआधी देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर जंगली श्वापदाने हल्ला करून पशू संपत्तीचे नुकसान केले आहे. वन विभागाने सदर बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

Previous articleकोल्हापुरातील रणरागिनींचा कौतुकास्पद उपक्रम
Next articleगावपातळीवर डॉक्टर कडून कोरोना च प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातपाटी गावात औषध वाटप.     
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.