Home बुलढाणा अतिवृष्टीमुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानाची यादी घरात बसून चहाच्या कपात लाभार्थी निवडून...

अतिवृष्टीमुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानाची यादी घरात बसून चहाच्या कपात लाभार्थी निवडून केली तयार!

48
0

आशाताई बच्छाव

IMG-20220905-WA0049.jpg

अतिवृष्टीमुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानाची यादी घरात बसून चहाच्या कपात लाभार्थी निवडून केली तयार!

संग्रामपुर तालुक्यातील कोद्री येथील शेतकऱ्यांची तक्रार. कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा!

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क संग्रामपूर)

संग्रामपूर:- जुलै 2022 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या ३३ टक्के पेक्षा जास्त शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची यादी ही तहसीलदार संग्रामपूर यांच्या आदेशाने नुकसान झालेल्या गावातील तलाठी ,कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांची नियुक्ती करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून यादी तयार करण्याचा आदेश संबंधितांना देण्यात आला होता. परंतु संग्रामपूर तालुक्यातील कोद्री येथील तलाठी, कृषी सहायक टाकसाळे व ग्रामसेवकांनी तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवत सर्व नियम धाब्यावर ठेवून “हम करे सो कायदा”अशी भूमिका घेत शेतकऱ्यांना कुठलीही माहिती न देता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकाची पाहणी न करता फक्त रस्त्यावरून दिसेल अशा शेतीची पाहणी करून व मोजक्या शेतकऱ्यांना बोलावून फोटो काढून दिखावे बाजी करून काही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व काही स्वतःच्या मनाने हितसंबंध जोपासत घरात बसून चहाच्या कपात काही लाभार्थी निवडून यादी तयार केल्याचा आरोप दिनांक ५ सप्टेंबर २०२२रोजी तहसीलदार व कृषी अधिकारी संग्रामपूर यांच्याकडे केलेल्या तक्रारीत कोद्री व कुंदेगाव शिवारातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानाची पाहणी न करतातच संबंधित सर्वे करणाऱ्यांनी हेतूपुरस्परपणे काही शेतकऱ्यांची नावे वगळली आहेत आणि जी यादी तयार झाली ती यादी ग्रामपंचायत कार्यालय कोद्री येथे लावण्यात आलेली नाही. त्यामुळे खरोखरच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अंधारात ठेवून त्या शेतकऱ्यांची फसवणूक केल्या गेली आधीच निसर्गापुढे आवाज दिल झाल्या शेतकऱ्यास जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे नुकसान होऊन सुद्धा वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी येऊ शकते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना हजर ठेवून यादी तयार करावी व दुष्काळ यादीपासून वंचित ठेवलेले शेतकरी यांचे नाव हे दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात यावे . आणि चुकीच्या पद्धतीने घरात बसून सर्वे करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा नुकसान होऊन सुद्धा अतिवृष्टी यादीपासून वंचित ठेवलेले सर्व शेतकरी लोकशाही मार्गाने तहसील कार्यालय संग्रामपूर येथे आमरण उपोषणास बसणार . याला सर्वस्वी संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असे तक्रारीत म्हटले असून.
कोद्री येथील शेतकरी गोपाल दांदळे, शिवशंकर दांदळे, संतोष दांदळे, ,श्रीकृष्ण दांदळे, गजानन दांदळे,उत्तम दांदळे, तुळशीराम दांदळे, प्रकाश दांदळे, गजानन मंडवाले, मनकर्णा डवले, यांच्या तक्रारीवर सह्या असून संबंधित तक्रार ची प्रतिलिपी- जिल्हाधिकारी बुलढाणा ,उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद, जिल्हा कृषी अधीक्षक बुलढाणा, यांना सुद्धा तक्रार देण्यात आली तरी नेहमिच बहुचर्चित असलेला संग्रामपूर तालुका येथे सर्व नियम ढाब्यावर ठेवूनच कारभार चालते असेच दिसून येते.? त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समस्या जाणून घेता तक्रारीस प्रथम प्राधान्य देऊन चुकीचा सर्वे करणाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Previous articleगौराई स्थापनेत सांप्रदायिक भजनातून गौराईची आराधना
Next articleअतिवृष्टीमुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानाची यादी घरात बसून चहाच्या कपात लाभार्थी निवडून केली तयार!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here