Home बुलढाणा गौराई स्थापनेत सांप्रदायिक भजनातून गौराईची आराधना

गौराई स्थापनेत सांप्रदायिक भजनातून गौराईची आराधना

66
0

आशाताई बच्छाव

IMG-20220905-WA0040.jpg

गौराई स्थापनेत सांप्रदायिक भजनातून गौराईची आराधना

युवा मराठा वेब न्युज पोर्टल
प्रतिनिधी – रवि शिरस्कार

गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया सामुहिक पद्धतीने गौरी पूजनाचे व्रत करतात.
यंदा शनिवारी 3 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचं आगमन झालं आहे. त्याचप्रमाणे रविवारी ज्येष्ठा गौरींना नैव्यद्य देऊन गावातील लोकांना गौरी प्रसाद प्राप्त झाला राज्यभरात जेष्ठा गौरींचं अतिशय उत्साहात आगमन झालं आहे. ज्येष्ठा गौरीं हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केलेला जाणारा मोठा उत्सव आहे. तीन दिवस चालणारा हा उत्सव राज्याच्या विविध भागात वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आणि मान्यतांनुसार साजरा केला जातो.
खामगाव तालुक्यातील सुटाळा या भागात जेस्ट गौरीला सामूहिक पध्दतीत प्रार्थना,भजने करून सांप्रदायिक भजनासोबत देवीचे गाणे गाऊन गौराइ ची सामूहिक आराधना केल्या जाते.गौरी स्थापनेनंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सांप्रदायिक भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात येतो. वेळेचं भान न ठेवता भजनाचा मनसोक्त आनंद घेऊन तसेच भजनात तल्लीन होऊन पेटी तबल्यावर ४ ते ५ तास सांप्रदायिक तसेच देवीच्या भजनाचा ठेका धरण्यात येतो आणि गौराईची आराधना करण्यात येते
यावेळी सामुदायिक प्रार्थनेत गावातील असंख्य लोक एकत्र येत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here