Home उतर महाराष्ट्र रयत कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष पत्रकार दिपक जाधव यांच्या प्रयत्नाने माळमाथा परीसरात...

रयत कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष पत्रकार दिपक जाधव यांच्या प्रयत्नाने माळमाथा परीसरात विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी बस सुरू

102
0

आशाताई बच्छाव

IMG-20220822-WA0025.jpg

रयत कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष पत्रकार दिपक जाधव यांच्या प्रयत्नाने माळमाथा परीसरात विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी बस सुरू

वासखेडी – येथील माळमाथा परीसरातील पिंझारझाडी,नवापाडा, ब्राम्हणवेल, वासखेडी ,झिरणीपाडा गावातील,११ वी१२ वी शिक्षणासाठी बस सेवा नसल्यामुळें मुलींना शिक्षणापासुन वंचित रहावे लागत होते, परंतु परीसरातील नागरीकांनी बस नसल्याची खंत रयत कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष पत्रकार दिपक जाधव यांना निदर्शनाला आणुन दिली व जाधव यांनी साक्री आगार प्रमुख श्रीयुत,महाजन साहेब यांची भेट घेत लेखी निवेदनाद्वारे आपली मागणी पुर्ण केली व आगार प्रमुख यांनी देखील हिरवा कंदिल दाखवत साक्री ते पिंझारझाडी ही बस तात्काळ सुरू करून एक आदर्श अधिकारी असल्याचे सिध्द करून दाखविले,ही बस साक्री आगारातुन सायंकाळी ५:३० वा.सुटते व वासखेडी ला ७:००ला पोहचते,व पिंझारझाडी येथुन सकाळी ६:०० ला निघुन ६:४५ला वासखेडी येथुन विध्यार्थ्यांना घेवुन निजामपुर ला ७:१५ला सोडते,बस सुरू झाल्याचा मनस्वी आनंद विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता, सायंकाळी बस येताच रयत कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष पत्रकार दिपक जाधव व शहीदाबी खाटीक यांच्या हस्ते श्रीफळ फोडुन सौ,आशाबाई रविंद्र साळुंखे यांनी बस ची आरती करून गावातील ग्रामस्थ माजी उपसरपंच मच्छिंद्र सुर्यवंशी व ज्येष्ठ नागरीक बाळाजी उखाजी सुर्यवंशी यांनी चालक व वाहक यांचे शाल श्रीफळ देऊन गौरव केला,
प्रसंगी माजी उपसरपंच संभाजी कुवर,सुरेश सुर्यवंशी, सुपडु नथ्थु साळुंखे, आबा साळुंखे, बापु पंडीत,मधुकर जाधव, भाईदास आबा,वेडु आबा,गुलाब खाटीक,मुन्ना खाटीक,भाऊसाहेब जाधव,रविन्द्र साळुंखे, आदी उपस्थित हाेते, यावेळी साक्री आगार प्रमुख महाजन साहेब व धुळे विभाग नियंत्रक सौ,सपकाळ मॅडम यांचे पत्रकार दिपक जाधव यांनी मनापासुन आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here