Home नांदेड मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकासासाठी ५६ कोटी रुपयाचा निधी आमदार डॉ....

मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकासासाठी ५६ कोटी रुपयाचा निधी आमदार डॉ. तुषार राठोड यांची माहिती

6
0

आशाताई बच्छाव

IMG-20220822-WA0024.jpg

मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकासासाठी ५६ कोटी रुपयाचा निधी
आमदार डॉ. तुषार राठोड यांची माहिती
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड कंधार विधानसभा मतदार संघातील काही रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने या रस्त्यां च्या विकासासाठी निधी मिळावा अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार पावसाळी अधिवेशनातील अर्थसंकल्पीय पुरवणी  मागण्यांमध्ये मतदार संघातील अत्यंत महत्त्वाच्या परंतु दुर्लक्षित अशा रस्त्यांच्या विकासासाठी ५६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुखेड – कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. तुषार राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत अधिक माहिती देताना आमदार डॉ. तुषार राठोड पुढे म्हणाले की बाराहाळी- बिल्लाळी- जाहूर- खानापूर हा रस्ता दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता असून सध्या परिस्थितीत या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे नागरिकांना दळणवळणासाठी या रस्त्यावरून वाहने घेऊन जाताना खूप त्रास होत आहे यासाठी कृष्णावाडी ते बापशेठवाडी या लांबीसाठी ०७ कोटी रुपये तर बापशेठवाडी पासून जाहूर पर्यंत च्या रस्त्यासाठी १८ कोटी रुपये असे एकूण २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. आहेत .त्यासोबतच उंद्री प.दे. येथील सोसायटी तांडा हा गेल्या ७५ वर्षांपासून पक्या रस्त्याविना वंचित होता. येथील माजी उपसरपंच तथा भाजपा कार्यकर्ते यशवंत बोडके, रामराव राठोड ,बळीराम राठोड, हनमंत वडजे ,ज्ञानेश्वर वडजे शेषराव वडजे ऊत्तम राठोड ,मोतीराम राठोड, काशिनाथ पवार ,बळीराम पवार आदींच्या मागणीनुसार सोसायटी तांड्याला स्वतः आमदार राठोड यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून या  रस्त्यासाठी प्रथम  रस्त्याचं श्रेणीवाढ करून या रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग या श्रेणीमध्ये स्थान देऊन या रस्त्याच्या कामासाठी ०५ कोटी रुपये मंजूर केले आहेत .
यासोबतच मुखेड -कंधार मतदारसंघातील दुसरा एक अत्यंत महत्वपूर्ण रस्ता असून तो म्हणजे अहमदपुर -मोहिजा- कुरूळा- नागलगाव- घोडज या रस्त्याला पूर्वी कुरूळा – नागलगाव पर्यंतच्या कामासाठी १०कोटी रुपये मंजूर केले होते. परंतु कुरूळा येथील नागरिकांना अहमदपुरकडे जाताना त्यांची अधिकची सोय व्हावी चांगला रस्ता उपलब्ध करून द्यावा म्हणून मोहिजा परांडा ते कुरूळा असे १३ कोटी रुपये नव्याने मंजूर करण्यात आले आहेत. कुरुळा -उमरगा खोजा- दिग्रस – गुंटुरया प्रमुख जिल्हा मार्गावरील काही रस्त्याची लांबी सततच्या पावसामुळे खराब झाली होती .यासाठी गुंटूर -दिग्रस – उमरगा खोजा- कुरूळा यासाठी १३ कोटी रुपये पुरवणी मागण्या मध्ये मंजूर करण्यात आल्याची माहितीही यावेळी आमदार महोदयांनी दिली.
राज्यात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर मुखेड- कंधार विधानसभा मतदारसंघाच्या रस्ते विकासासाठी नव्या सरकारने आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या मागणीला झुकते माप दिल्याचे या निधी मंजूरीतून दिसून येत आहे.
या पत्रकार परिषदेला कृषी उत्पन्न बाजार समिती मुखेड चे सभापती एड. खुशालराव पाटील उमरदरीकर, मुखेड पंचायत समितीचे सभापती प्रतिनिधी लक्ष्मणराव पाटील खैरकेकर, उपसभापती प्रतिनिधी मनोज भाऊ गोंड , बालाजी पाटील शिंदे बिल्लाळीकर, गणेश पाटील जाधव, भाजपा शहराध्यक्ष किशोरसिंह चौव्हाण ,आनंदराव पाटील जुने बेरळीकर, व्यंकटराव लोहबंदे, राजू घोडके ,हनुमंत पाटील नरोटे सुधीर चव्हाण आदी उपस्थित होते.

Previous articleरयत कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष पत्रकार दिपक जाधव यांच्या प्रयत्नाने माळमाथा परीसरात विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी बस सुरू
Next articleसरपंच निवडीत शिवसेना शिंदे गटाची बाजी. आमदार सुहास आण्णा कांदे यांचा वरचष्मा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here