Home बुलढाणा बाजार बंद आदेश असताना संतप्त लोकांनी बाजाराची मुख्य जागा सोडून रस्त्यावर भरविला...

बाजार बंद आदेश असताना संतप्त लोकांनी बाजाराची मुख्य जागा सोडून रस्त्यावर भरविला गुरांचा बाजार

46
0

आशाताई बच्छाव

IMG-20220926-WA0013.jpg

बाजार बंद आदेश असताना संतप्त लोकांनी बाजाराची मुख्य जागा सोडून रस्त्यावर भरविला गुरांचा बाजार

युवा मराठा वेब न्युज पोर्टल
प्रतिनिधी–रविंद्र शिरस्कार,संग्रामपूर

संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल हे मध्यवर्ती ठिकाण असून येथे दर आठवड्याला शनिवार या दिवशी गुरांची फार मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री चालत असते अनेक वर्षापासून हा गुरांचा बाजार चालू आहे या बाजारामध्ये वेगवेगळ्या ठिकाण वरून वेगवेगळ्या खेड्यांवरून आपली गुरे घेऊन आशा अपेक्षेने अनेक लोक येत असतात मात्र हा बाजार गेल्या महिन्यापासून गुरांच्या लंपी आजारामुळे आदेश नुसार भरत नाही त्यामुळे या ठिकाणी होत असलेले गुराढोरांची खरेदी विक्री बंद आहे त्यामुळे अनेक शेतकरी वर्ग,अनेक गुरेढोरे विक्री वर्ग नाराजगी व्यक्त करत आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी हा बाजार भरण्यात येतो ठिकाणी अचानक हजेरी लावणाऱ्या पावसामुळे सर्वीकडे चिखल साचला आहे या अगोदर येथील लोकांनी व्यापारी वर्गाने गुरे ढोरे यांना बसण्याकरिता तसेच व्यापार करण्याकरता जागा दुरुस्त करण्याकरता मागणी केली होती परंतु परिस्थिती जैसे थे असल्यामुळे तसेच बाजार मागील 1 महिन्यापासून भरत नसल्यामुळे संताप व्यक्त करत आज दिनांक 24 सप्टेंबर शनिवार रोजी शेतकरी वर्ग यांनी सोनाळा रोडवरील पेट्रोल पंपाजवळ सकाळी गुरे, बकऱ्या घेऊन विक्रीकरिता आणली आणि बाजार भरविला त्यामुळे रोडवर बरीच मोठी गर्दी झाली होती या रस्त्यावर 2 पेट्रोल पंप असल्यामुळे वाहनांची बरीच वर्दळ असते त्यामुळे वाहन धारकांना खूप वेळ त्रास सहन करावा लागला त्यामुळे बाजार लवकर चालू करून बाजार भरत असलेल्या ठिकाणी योग्य ती व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी लोकांच्या चर्चेत दिसून आली.

Previous articleपंतप्रधान आवास योजनेच्या प्रपत्र ब मधील अपात्र लाभार्थी धारकांना चौकशी करून घरकुलाचा लाभ द्या गावकऱ्यांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन
Next articleयुवा पत्रकार पुरस्कार गणराज पॅलेस येथे संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here